नवी दिल्ली : दत्तू भोकनळवर लावण्यात आलेली दोन वर्षांच्या बटदीची शिक्षा पहिल्यांदा चूक करण्यासाठी कठोर असल्याचे मत व्यक्त करीत भारतीय नौकानयन महासंघाने (आरएफआय) यावर फेरविचार करावा, अशी सूचना भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी केली आहे.भोकनळ हा २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान रेसच्या मध्येच थांबला होता. यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली. विश्व चॅम्पियनशिपची कांस्य विजेती लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज हिने आयओएला पत्र लिहून दत्तूवरील अन्यायाकडे लक्ष वेधले. यावर बत्रा यांनी हस्तक्षेप केला. आयओएच्या अॅथलिट आयोगाची अध्यक्ष असलेल्या अंजूने आगामी टोकियो आॅलिम्पिक लक्षात घेत भोकनळवरील शिक्षा कमी करण्याची शिफारस केली. आरएफआय अध्यक्ष राजालक्षमी देव यांना लिहिलेल्या पत्रात बत्रा म्हणाले, ‘मी यावर दुसऱ्यांदा विचार करण्याची विनंती करतो. कारण एखाद्या खेळाडूने पहिल्यांदा चूक केल्यास त्याला सहा महिन्यांपेक्षा अधिक बंदीची शिक्षा दिली जावी, असा कुठलाही नियम नाही. त्याने जाणिवपूर्वक कृती केली नसेल, तर त्याच्यावरील बंदी कमी केली जावू शकते.’ (वृत्तसंस्था)>दोन वर्षांची बंदीभोकनळ आशियाई स्पर्धेत पुरुषांच्या स्क्वॉड्रल स्कल्स प्रकारात सुवर्ण विजेत्या चार जणांच्या पथकाचा सदस्य होता. सिंगल स्कल प्रकारादरम्यान तो स्पर्धेच्या मध्येच थांबला होता. यानंतर भोकनळने, ‘मी नावेवरुन पडलो होतो. नाव उलटल्यामुळे त्या दिवशी मला चांगले वाटत नव्हते,’ असे म्हटले होते. आरएफआयने मागच्यावर्षी पाच महिन्यात दत्तूला दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली शिवाय त्याचे म्हणणेही फेटाळून लावले होते.
दत्तू भोकनळच्या शिक्षेचा फेरविचार करा, बत्रा यांची नौकानयन महासंघाला सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 3:20 AM