नवी दिल्ली : रायफल नेमबाज दिव्यांश सिंग पनवारचा बुधवारी ऑलिम्पिक पोडियम प्रणालीच्या (टॉप्स) कोअर ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला. दिव्यांशचा मुख्य इव्हेंट १० मीटर एअर रायफल आहे. तो सुरुवातीला टॉप्सच्या डेव्हलपमेंट ग्रुपचा भाग होता. भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (साई) मते अलीकडच्या कालावधीतील कामगिरी पाहून त्याचा कोअर ग्रुपमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्याने बीजिंगमध्ये विश्वचषकमध्ये रौप्य पटकावित भारताला आॅलिम्पिक कोटा मिळवून दिला.दरम्यान, दिव्यांश म्युनिचमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकमध्ये पात्रता मिळवण्यात अपयशी ठरला. साई महासंचालक नीलम कपूर यांच्या अध्यक्षतेखालील मिशन आॅलिम्पिक समितीच्या (एमओसी) बैठकीत सात खेळाडूंसाठी आर्थिक फंडाचा प्रस्ताव मंजुर झाला. या खेळाडूंमध्ये चॅम्पियन भारोत्तोलक मीराबाई चानू, अव्वल नेमबाज सौरभ चौधरी, बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांत, धावपटू जिनसन जॉन्सन आणि पॅरा अॅथ्लिट शरद कुमार यांचा समावेश आहे.
रायफल नेमबाज दिव्यांशसिंग ‘टॉप्स’मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 4:20 AM