पणजी : ब्राझीलमध्ये २०१६ मध्ये होणा-या रियो आॅलिम्पिक स्पर्धेनंतर निवृत्ती घेऊ शकते, असा ‘पंच’ भारताची आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सर मेरी कोमने लगावला. मात्र, यावर अंतिम निर्णय झाला नसल्याचेही तिने स्पष्ट केले. एका कार्यक्रमात मेरी कोम बोलत होती. ती म्हणाली, की निवृत्तीबाबत मी अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही. मात्र, तशी शक्यताही नाकारता येत नाही. रिओ आॅलिम्पिकनंतर मी खेळणार नाही. मी निवृत्तीही घेऊ शकते. सध्यातरी आॅलिम्पिकसाठी तयारी करीत आहे. देशासाठी अजून काही तरी करण्याचा प्रयत्न असेल. या वर्षी काही विशेष आंतरराष्ट्रीय स्पर्धा नाहीत, त्यामुळे आमंत्रित स्पर्धेत भाग घेऊन तयारी करण्यावर भर आहे, असेही तिने सांगितले. (वृत्तसंस्था)
रियो आॅलिम्पिकनंतर निवृत्तीचे संकेत!
By admin | Published: January 13, 2015 2:16 AM