ऑनलाइन लोकमतरिओ दी जानिरो, दि. ९ - रिओ ऑलिम्पिकचा तिसरा दिवस भारतासाठी निराशजनकच ठरला, अभिनव बिंद्राला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पदकाची आशा त्यामुळे दुळीस मिळाला. महिला हॉकीच्या ब गटातील दुसऱ्या सामन्यात भारताला आज पराभाला सामोरे जावं लागल. भारताने आज निराशजनक खेल केला. इंग्लंडने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना भारतावर ३-० ने केली मात केली. या पराभवामुळे ब गटात भारत एक गुणासह चौथ्या स्थानवर घसरला तर इंग्लड अग्रस्थानी पोहचला आहे. भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. तब्बल 36 वर्षांनी ऑलिंपिकमध्ये पुनरागमन करणाऱ्या भारतीय महिलांनी हॉकीत रविवारी पहिल्या सामन्यात जपानला बरोबरीत रोखले होते. आक्रमण हेच सूत्र अवलंबून खेळणाऱ्या इंग्लडच्या महिलांनी सामन्याच्या सुरवातीपासूनच भारतीय खेळाडूंवर दडपण वाढवले. इंग्लडने सामन्याच्या १५ व्या आणि २४ व्या मिनिटाला गोल करत सामन्यात आघाडी घेतली. पहिल्या हाफमध्ये इंग्लडने २-० ने पछाडत सामन्यात निर्वाधित वर्चस्व मिळवले. दुसऱ्या हाफमध्ये भारतावर ते वर्चस्व राखत तिसरा गोल केला. संपुर्ण सामन्यात भारतीय संघात आक्रमण धारदार झालेच नाही. ब गटातील सामन्यात पहिल्या क्वॉर्टरमध्ये दोन्हीसघांला एकही गोल करता आला नाही. मात्र दुसर्या क्वॉर्टरच्या तिसऱ्या मिनिटालाच गोल करत इंग्लडने भारतावर आघाडी मिळवली. २५ व्या मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर इंग्लडच्या जिसेल एन्स्लीने गेल करत आघाडी भक्कम केली. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये इंग्लडने अधिक धारधार खेळ केला. अॅलेक्साड्रा डेनसने ३३ व्या मिनिटाला गोल करत भारतावरील आघाडी अधिक भक्कम केला. चौथ्या क्वॉर्टर मध्ये भारताला सामन्यात परतण्याची संधी होती. भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. मात्र भारताला त्याचा फायदा उचलता आला नाही. दोन्हीवेळी भारताच्या पदरी निराशाच आली.
रिओ : महिला हॉकी सामन्यात भारताचा ३-०ने पराभव
By admin | Published: August 09, 2016 6:31 AM