शिवाजी गोरे -
अॅथलेटिक्स : ३६ तास विमान प्रवासाने कामगिरीवर परिणाम
रिओ दि जानेरो , दि. 13 - भारताची वेगवान धावपटू दूती चंदला शुक्रवारी रात्री (भारतात शनिवारी पहाटे ४ वाजता) झालेल्या महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
ऑलिम्पिक स्टेडियमच्या ट्रॅकवर सुरु असलेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या शंभर मीटर धावण्याच्या शर्यती दुती चंदला पाचव्या फेरीत चौथ्या लेन मिळाली होती. स्टाटरने गोळी उडविल्यानंतर तीची सुरुवात तर चांगली झाली होती पण, तिला अंतर आपला वेगात सात्यत ठेवून पुढे वाढविण्यास अपयश आले. तिच्यासह धावत असलेल्या अमेरिकेच्या नियाना बार्टोलेटा व पोलंडच्या इव्हा सुबोडा बरोबर आपला वेग कायम ठेवता आला नाही. ५० मीटरच्या पुढे ती मागे पडली. तिला शेवटी ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिने शर्यत ११.६९ सेकंदात पूर्ण केली. मॉस्को ऑलिम्किपकमध्ये ३६ वर्षापूर्वी भारताची पी.टी. उषा १०० मीटरमध्ये सहभागी झाली होती त्यांनतर आता दूती पात्र ठरली होती.
भारतातून तेथे पोहोचण्यासाठी इकोनॉमिक क्लासमधून लागलेले ३६ तास आणि तेथील थंड वतावरणामुळे माझ्या कामगिरीवर परिणाम झाला. मी येथे ५ ऑगस्टला पोहोचले. येथे आल्यावर प्रवासामुळे माझ्या पाठीत थोडे दुखत होते. येथिल वातावरणाशी जुळून घेण्यासाठी मला दोन दिवस लागले. शर्यतीच्या आधी ट्रॅकवर आल्यानंतर माझ्या बरोबर धावणाºया अमेरिका व पोलंडच्या उंचपु-या धावपटू त्यांच्याकडे पाहून थोडे दडपण आले होते. त्या दडपणातून मी बाहेर पहायलासुध्दा मला उशिर झाला. माझी राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीची ११.२४ सेकंदाच्या वेळीची सुध्दा मी बरोबरी करू शकले नाही. पण एकूण माझ्या कामगिरीवर मी समाधानी आहे.
--दुती चंद
पुरूष लांब उडी :
भारताच्या अंकित शर्माने पुरूषांच्या लांब उडीत पात्र होऊ शकला नाही. त्याने ७.६७ मीटर लांब उडी मारली. पहिल्या व दुसºया संधीत त्याच्याकडून पाऊल झाला. पहिला व दुसरा फाऊल झाल्यामुळे त्याच्यावर आलेल्या दडपणामुळे त्याने तिसºया संधीत ७.६७ मीटरची कामगिरी केली.