नवी दिल्ली : देशाचा स्टार नेमबाज चैनसिंह आणि आॅलिम्पिक कांस्यपदक विजेता गगन नारंग ब्राझीलच्या रियो शहरात सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वकप स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोन स्पर्धेत अनुक्रमे ४५ व ४८ व्या स्थानावर राहिले.चैनसिंह ६१७.१ गुणांसह ४५ व्या, तर नारंग क्वॉलिफाइंग राउंडमध्ये ६१५.५ गुणांसह ४७व्या स्थानी राहिला. पुरुषांच्या स्कीट स्पर्धेत मेराज अहमद आणि शिराज शेख, तसेच रॅपिड फायर पिस्टल राउंडमध्ये गुरप्रीतसिंगने चांगली सुरुवात केली.शिराज शेख स्कीट क्वॉलिफिकेशनच्या पहिल्या राउंडमध्ये २५ चा शानदार स्कोअर बनवताना अव्वल स्थानी राहिला, तर मेराज २४ आणि २२ चे दोन राउंड खेळून २२ व्या स्थानावर राहिला. एक अन्य भारतीय खेळाडू मानसिंह ४६ व्या क्रमांकावर राहिला.रॅपिड फायरमध्ये गुरप्रीत २८९ गुणांसह १४ व्या स्थानी राहिला. महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्समध्ये क्रोएशियाच्या स्जेजाना पी. हिने विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले. तिने क्वॉलिफाइंग फेरीत ५९४ आणि फायनलमध्ये ४५८.८ गुण नोंदवले. जर्मनीची बार्बरा ई. हिने रौप्यपदक जिंकले. (वृत्तसंस्था)
रियोत चैन ४५, गगन ४८व्या स्थानी
By admin | Published: April 24, 2016 3:57 AM