नवी दिल्ली : झारखंडविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात दिल्लीचा युवा फलंदाज ऋषभ पंत याने केवळ ४८ चेंंडंूत शतकी तडाखा देत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वांत जलद शतक ठोकण्याचा विक्रम केला. केरळमधील थुम्बा येथे सुरू असलेल्या या सामन्यात पंतने ६७ चेंडंूत ८ चौकार व १३ षटकारांची आतषबाजी करून १३५ धावांची तुफानी खेळी केली.पंतने यंदाच्या मोसमामध्ये धमाकेदार खेळ करताना आतापर्यंत ७ डावांत १३३.१६च्या जबरदस्त सरासरीने ७९९ धावा कुटल्या आहेत. यंदाच्या सत्रातील पंतने चौथे शतक ठोकले आहे. तसेच, आतापर्यंतच्या ५ सामन्यांत त्याने तब्बल ४४ षटकार टोलावले आहेत. या सत्रात त्याची कामगिरी १४६, ३०८, २४, ०९, ६०, ११७ आणि १३५ अशी शानदार झाली आहे. या विक्रमी खेळादरम्यान पंतने तमिळनाडूचे माजी फलंदाज व्ही. बी. चंद्रशेखर व आसामचे माजी फलंदाज राजेश बोरा यांचा २८ वर्षे जुना असलेला विक्रम मोडला. या दोघांनीही प्रत्येकी ५६ चेंडूंत वेगवान शतक झळकावले होते. बोरा यांनी १९८८ फेब्रुवारीमध्ये त्रिपुराविरुद्ध गुवाहाटीमध्ये रणजी स्पर्धेत, तर चंद्रशेखर यांनी त्याचवर्षी शेष भारताविरुद्ध ही खेळी केली होती.१९ वर्षीय पंतने पहिल्या डावातही शतक झळकावताना ८२ चेंडू खेळले होते. त्याने पहिल्या डावात १०६ चेंडंूत ११७ धावा काढल्या होत्या. यासह तो, दोन्ही डावात शतक झळकावणार सहावा दिल्लीकर ठरला. याआधी मन्सूर अली खान पतौडी, सुरिंदर खन्ना, मदनलाल, अजय शर्मा आणि रमन लांबा यांनी अशी कामगिरी केली होती.1982मध्ये झालेल्या शेफिल्ड शिल्ड सामन्यात त्यांनी दक्षिण आॅस्टे्रलियाकडून खेळताना व्हीक्टोरियाविरुद्ध अॅडेलेड ओव्हल येथे अवघ्या ३४ चेंडंूत शतकी तडाखा दिला होता.जागतिक स्तरावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वांत जलद शतक झळकावण्याचा विक्रम आॅस्टे्रलियाच्या डेव्हिड हुक्सच्या नावावर आहे.
ऋषभ पंतचे विक्रमी वेगवान शतक
By admin | Published: November 09, 2016 2:14 AM