ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24- वादग्रस्त टि्वट केल्याने नेहमीच चर्चेत असणारे अभिनेते ऋषी कपूर एका नव्या टि्वटमुळे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. ऋषी कपूर यांनी भारतीय महिला टीमवर अश्लिल टि्वट केलं. या ट्विटमुळेच ऋषी कपूर यांना नेटीझन्सने चांगलचं टार्गेट केलं आहे. अभिनेते ऋषी कपूर यांनी महिला भारतीय क्रिकेट टीमसाछी रविवारी संध्याकाळी टि्वट केलं होतं.
Waiting for a repeat of Sourav Ganguly"s act on the balcony of The Lords Ground,London,when India beat England 2002 NatWest series final! YO pic.twitter.com/z1XAde3JLb— Rishi Kapoor (@chintskap) July 23, 2017
"लॉर्डस ग्राऊंडवर सौरव गांगुलीने केलेली कृती पुन्हा केली जाईल याची वाट पाहत आहे. २००२ मध्ये भारताने नेटवेस्ट मालिकेतील अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत केलं होतं. तेंव्हा सौरवने केलेली कृती आठवते आहे," असं ऋषी कपूर यांनी टि्वटमध्ये म्हटलं. ऋषी कपूर यांच्या याच ट्विटवर सध्या सोशल मीडियावर टीका होते आहे.
भारताने लॉर्डस मैदानावर फायनस मॅच जिंकल्यानंतर टीम इंडियाचा तत्कालिन कर्णधार सौरव गांगुलीने अंगातील टी-शर्ट काढून जल्लोष केला होता. त्यामुळे सौरव गांगुलीवर त्यावेळी चांगलीच टीका झाली होती. महिला टीमने आयसीसी वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये इंग्लंडला हरवून सौरव सारखं कृत्य करावं, असं दर्शविणारं अश्लिल टि्वट ऋषी कपूर यांनी केल्याने सोशल मीडियावर नेटीझन्सने त्यांच्यावर टीकेची झोड घेतली आहे.
ऋषी कपूर यांनी ट्विट केल्यावर अवघ्या काही वेळातच लोकांनी कमेंट करायला सुरूवात केला. "सर आज जॅक डॅनियल की ब्लॅक लेबल घेतली?," अशी खोचक टीका एका युजरने केली आहे. तर दुसऱ्याने "रविवार असल्यामुळे पूर्ण बॉटल पिऊन टि्वट करावं असं काही नाही," असा टोला ऋषी कपूर यांना लगावला आहे. भारतीय महिला संघात सनी लियोनी नाही, असंही एका ट्विटर युजरने म्हंटलं आहे.
ट्विटरवरील लोकांच्या कमेंट पाहून ऋषी कपूर यांनीही नेटीझन्सना उत्तर दिलं आहे. माझ्या ट्विटमध्ये चुकीचं काय होत ? महिला खेळाडूने सौरव सारखं करावं, असं मी म्हंटलं नाही. सौरवने जे केलं तो शो त्याने परत करावा, असं मी म्हंटलं होतं. तुमच्या डोक्यात चुकीच्या गोष्टी आहेत. असं ट्विट करत ऋषी कपूर यांनी त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
आणखी वाचा
‘या’ कपल्सनी वेगळे झाल्यानंतरही घेतला नाही घटस्फोट!
कंगनाने ओपन लेटर लिहीत सैफला पाजले डोस!