शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

रॉजर फेडररमुळे तो झाला कोट्याधीश

By admin | Published: July 16, 2017 10:00 PM

हिरवळीवरचा राजा असा लौकिक असलेल्या रॉजर फेडररने आज विम्बल्डनमध्ये विजयी चषक उंचावताच त्याचा चाहता कोट्यधीश झाला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 16 - रॉजर फेडररनं आज आवव्यांदा विम्बल्डनच्या विजेतेपदाला गवसणी घातली तर कारकिर्दीतील 19 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले. हिरवळीवरचा राजा असा लौकिक असलेल्या रॉजर फेडररने आज विम्बल्डनमध्ये विजयी चषक उंचावताच त्याचा चाहता कोट्यधीश झाला आहे. फेडरर आज कोर्टवर खेळण्यासाठी उतरला तेव्हा त्या लाखो चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं त्याच्या डोक्यावर होतं. फेडररच जिंकणार या विश्वासाने त्याच्यावर तब्बल 50 हजार युरो म्हणजे सुमारे 36 लाख रुपयांची पैज लंडनमध्ये राहणाऱ्या जॉर्जनं लावली होती. फेडररनं आजचा सामना सरळ तीन सेटमध्ये जिंकल्यामुळे त्यानं ही पैज जिंकली आणि तो मालामाल झाला. पैज जिंकल्यामुळे जॉर्जला 1 लाख 62 हजार युरो म्हणजेच 1 कोटी 19 लाख 41 हजार रुपये मिळाले आहेत.जॉर्ज हा एका टेक कंपनीचा हेड आहे. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या रकमेची पैज लावल्याचं त्याने आपल्या गर्लफ्रेण्डलाही सांगितलेलं नव्हतं. ह्यमाझी गर्लफ्रेण्ड फारशी टेनिस पाहत नाही. त्यामुळे तिला याची कल्पना दिलेली नाही. मी फारशा पैजा लावत नाही. पण जेव्हा बेट लावतो, तेव्हा ती जिंकेन याची खात्री असेल तरच. असं जॉर्ज मॅचपूर्वी म्हणाला होता. या मोसमात फेडररने तीन विजेतेपदं मिळवल्यामुळे जॉर्जचा आत्मविश्वास दुणावला होता.आज झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत मारिन सिलिचवर 6-3, 6-1, 6-4 अशी सरळ सेटमध्ये मात करत फेडररने विक्रमी आठव्यांदा विम्बल्डनच्या विजेतेपदाला गवसणी घातली. स्वीत्झर्लंडच्या या महान खेळाडूच्या आव्हानाचा सामना करणे प्रतिस्पर्धी मारिन सिलिचला शक्य झाले नाही. पहिला गेम जिंकत सिलिचने चांगली सुरुवात केली. पण त्यानंतर फेडररच्या आव्हानासमोर त्याची डाळ शिजली नाही.पहिल्या सेटमध्ये 6-3 ने बाजी मारल्यानंतर फेडररने सिलिचसाठी पुनरागमनाची कोणतीही वाट ठेवली नाही. दुसऱ्या सेटमध्ये सिलिच फेडररच्या आक्रमणापुढे पूर्णपणे निष्प्रभ झालेला दिसला. त्याचा फायदा उठवत फेडररने हा सेट 6-1 अशा फरकाने खिशात घातला. त्यानंतर तिसरा सेट 6-4 ने जिंकून फेडररने सामन्यासह विम्बल्डनच्या आठव्या विजेतेपदावर अगदी दिमाखात कब्जा केला.तत्पूर्वी उपांत्य फेरीत ३५ वर्षीय फेडररने झेक प्रजासत्ताच्या ३१ वर्षीय थॉमस बर्डिचचे कडवे आव्हान 7-6, 7-6, 6-4 असे परतवले होते. तर पहिल्यांदाच विम्बल्डनची अंतिम सिलिचने गाठताना अमेरिकेच्या सॅम क्युरे याला नमवले होते. दोन तास 56 मिनिटांपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात सिलिचने क्युरेला 7-6, 4-6, 7-6, 7-5 असे पराभूत केले.