शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

रॉजर फेडररचे ‘ग्रँड’ त्रिशतक!

By admin | Published: January 23, 2016 3:54 AM

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हला धूळ चारून आपला

मेलबोर्न : जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हला धूळ चारून आपला ३०० वा ग्रँडस्लॅम सामना जिंकला. महिला गटात अव्वल टेनिसपटू अमेरिकेची सेरेना विल्यम्स, रशियाच्या मारिया शारापोव्हा यांनी विजयी धडाका कायम राखताना चौथी फेरी गाठली. फ्रान्सच्या विल्फ्रेड त्सोंगा याने अनुभवाच्या बळावर आपल्याच देशाच्या पियरे जू हर्बर्टवर ६-४, ७-६, ७-६ अशा फरकाने मात करताना अंतिम १६ खेळाडूंत प्रवेश केला, तर १५ वे मानांकन प्राप्त बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिन याने आॅस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमचा ६-१, ३-६, ७-६, ७-५ असा पराभव करताना स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. चौथ्या फेरीच्या लढतीत गॉफिनसमोर अनुभवी रॉजर फेडररचे आव्हान असेल. महिला गटातील एकेरी लढतीत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सेरेना विल्यम्सने रशियाच्या १८ वर्षीय डारिया कसात्किनावर ६-१, ६-१ अशी सहज मात करीत चौथ्या फेरीत प्रवेश केला. सेरेना हिने या लढतीत २४ विनर्स लगावले. अवघ्या ४४ मिनिटांत तिने हा सामना आपल्या नावे केला. गतविजेत्या रशियाच्या मारिया शारापोव्हा हिने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिसवर ६-१, ६-७, ६-० अशी सरशी साधून पुढची फेरी गाठली. (वृत्तसंस्था)जोको एक्स्प्रेसचा विजयी धडाकाजागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने लौकिकास साजेसा खेळ करताना आॅस्ट्रेलियन ओपनच्या चौथ्या फेरीत जागा मिळविली. या स्टार खेळाडूने तिसऱ्या फेरीत पुरुष गटातील एकेरी लढतीत इटलीच्या आंद्रियास सेपीला ६-१, ७-५, ७-६ अशा फरकाने पराभूत करताना अंतिम १६ खेळाडूंत जागा निश्चित केली. विशेष म्हणजे सेपीविरुद्ध जोकोविचचा हा सलग ३३ वा विजय ठरला. तरीही निशिकोरी जिंकलापुरुष गटात स्पेनच्या गुईलेर्मो गार्सिया लोपेजविरुद्धच्या लढतीत जपानच्या केई निशिकोरीच्या हाताला दुखापत झाली होती. मात्र त्याने हार न मानता हातावर उपचार घेत सामना खेळला. विशेष म्हणजे या लढतीत निशिकोरीने ७-५, २-६, ६-३, ६-४ अशा फरकाने पराभव करीत पुढच्या फेरीत प्रवेश केला.बोपन्ना तिसऱ्या फेरीत, भूपती पराभूतभारताचा अनुभवी खेळाडू रोहन बोपन्ना आणि रोमानियाच्या फ्लोरिन मर्जिया यांनी आॅस्ट्रेलियन ओपनच्या दुहेरीत विजयी अभियान कायम राखताना तिसरी फेरी गाठली; मात्र भारताच्या महेश भूपतीला आपल्या जोडीदारासह पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष गटातील दुहेरीत बोपन्ना आणि मर्जिया या जोडीने झेक प्रजासत्ताकच्या लुकास डलूही आणि जिरी वेस्ली यांच्यावर सरळसेटमध्ये ६-३, ६-२ ने विजय मिळवून उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला; मात्र अन्य लढतीत भारताचा महेश भूपती आणि लॅग्झम्बर्गचा जाईल्स म्युलर यांना अमेरिकेच्या बॉब आणि माईक ब्रायनकडून ३-६, २-६ असा पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, भारताचा लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगीस यांचा अनास्तासिया पावलियुचेनकोव्हा आणि डोमिनिक इंग्लोट या रशियन खेळाडूंविरुद्धचा मिश्र दुहेरीचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.