ब्रिस्बेन : महान टेनिसपटू रॉजर फेडररने आज आपल्या कारकिर्दीतील एक हजारावा विजय मिळवित ब्रिस्बेन इंटरनॅशनल स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले. अव्वल मानांकित फेडररने अंतिम फेरीत कॅनडाच्या मिलोस राओनिचचा २ तास १२ मिनिटे रंगलेल्या लढतीत ६-४, ६-७, ६-४ने पराभव केला. फेडररचे कारकिर्दीतील हे ८३वे जेतेपद आहे. स्वित्झर्लंडचा ३३वर्षीय फेडरर एटीपी टूरमध्ये एक हजार सामने जिंकण्याची कामगिरी करणारा जगातील केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी जिम्मी कोनर्स (१२५३) व इव्हान लेंडल (१०७१) यांनी असा पराक्रम केला आहे. रॉजर ंफेडररचा हा कारकिर्दीतील १२२७वा सामना होता.
रॉजर फेडररचा हजारावा विजय!
By admin | Published: January 12, 2015 1:35 AM