पुणे : पुण्याचा अव्वल जलतरणपटू रोहन मोरेने न्यूझीलंडची कुकस्ट्रेट खाडी (चॅनेल) ८ तास ३७ मिनिटांत पार करून नवा आशियाई उच्चांक नोंदवला. न्यूझीलंडच्या दक्षिण व उत्तर बेटामधील ही २६ किलोमीटर अंतराची खाडी पार करताना जगामधील अवघड सात समुद्र (असोसिएशन सेव्हन चॅलेंज) पार करणारा तो आशियामधील व भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ठरला, तर जगामधील तो नववा जलतरणपटू म्हणून मान मिळवला.रोहनला ही कामगिरी करण्यासाठी गेली तीन आठवडे खराब हवामानामुळे आपल्या मोहिमेची वाट पाहावी लागली.अखेर निसर्गाने ९ फेब्रुवारीला त्याला साथ दिली. त्याने सकाळी ९.३० वाजता पोहण्यास उत्तर बेटाकडून प्रारंभ केला. पहिल्या पाच तासांत समुद्र शांत होता व तापमान १९ सेंटिमीटर होते.पण तो दक्षिणेच्या बेटाकडे येऊ लागला. तसे पाण्याचे तापमान अॅन्ट्रासिरिक खंडामधून येणाºया पाण्याच्या प्रवाहामुळे चार सेंटिमीटर उतरले. परंतु त्याने जिद्दीने थंड पाणी व जोरदार अॅन्ट्रासिरिक खंडाच्या प्रवाहावर मात करत ही खाडी ८ तास ३७ मिनिटांत केली.कुकस्ट्रेटच्या दक्षिण किनाºयावर जेव्हा रोहन पोहोचला तेव्हा मला माझे आनंदाश्रू आवरता आले नाही. त्याने मनाशी बाळगलेले मोठे ध्येय पूर्ण झाले. त्याने हा विक्रम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. त्याला जेव्हा कळाले, की वातावरण योग्य नाही तेव्हा तो खूप नाराज झाला होता. पण, तेथील सहकाºयांनी त्याला धीर दिला आणि आपण वाट पाहू, आपल्याला नक्कीच यश येईल, असे जेव्हा सांगितले तेव्हा त्याला बरे वाटले. आणि लगेच तिसºया दिवशी हवामान योग्य असल्याचा आम्हाला निरोप आला आणि त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याने अपुºया साधनसामग्रीने अथांग सागराच्या लाटांवर स्वार होऊन हे यश मिळवून तिरंगा फडकावित भारताचे नावलौकिक केले, याचा मला अभिमान वाटत असल्याचे रोहनच्या आई विजया दत्तात्रेय मोरे यांनी ‘लोकमत’ला न्यूझीलंड येथून सांगितले.‘ओशियन सेव्हन’नंतर माझे ध्येय आता भारताला टोकिओ आॅलिम्पिकमध्ये सागरी जलतरणात पदक मिळवून द्यायचे आहे. रिओच्या आॅलिम्पिक स्पर्धेत हुकलेली संधी मनात सलत आहे. पुढील दोन वर्षे त्यासाठी मेहनत करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील युवकांमध्ये सागरी जलतरणाच्या दृष्टीने मोठी गुणवत्ता आहे. त्यासाठी राज्य सरकार व समाजाने या खेळाला संपूर्ण साह्य करावे, अशी अपेक्षा आहे. - रोहन मोरेवयाच्या ११ व्या वर्षी रोहनने पहिली धरमतर ते गेट वे आॅफ इंडिया ही ३५ किलोमीटरची खाडी ७ तास २९ मिनिटांत पार केली होती. त्यानंतर २० वर्षांनी तिहेरी चॅनेल पार करण्याचा विक्रम ११ महिन्यांत केला. त्यापैकी बरेच भारतीय व आशियाई पहिल्या जलतरणपटूने केले होते. इंग्लिश चॅनेल त्याने १३ तास व २३ मिनिटांत, नॉर्थ चॅनेल १२ तास व ४ मिनिटांत, कॅथेलिना चॅनेल १० तास व १७ मिनिटांत, मोलकाई चॅनेल १७ तास व २८ मिनिटांत, सुगारू (जपान) स्ट्रेट १० तास व ३७ मिनिटांत व गिलबर्ट स्ट्रेस ३ तास ५६ मिनिटांत पार केली होती. त्यानंतर त्याने कुक स्ट्रेट पार करून ‘ओशिएल सेव्हन’ हा किताब मिळवला. त्याशिवाय मॅनहॅटन चॅनेल ७ तास ४३ मिनिटांत पार करून तिहेरी मुकुट मिळवला होता. केंद्र सरकारचा तेनसिंग नॉर्वे पुरस्कार राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते स्वीकारले होता. रोहनला लंडनमध्ये ३१ मार्च रोजी ‘हॉल आॅफ फेम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.या महत्त्वाच्या चॅनेलमध्ये मला त्यांची साथ देता आली, याचा मला खूप आनंद वाटत आहे. खाडी पोहणे काय असते, ते मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तसा माझा आणि जलतरणाचा काहीच संबंध नाही. रोहनबरोबर लग्न झाले आणि मला त्यांच्या ओशन सेव्हन चॅलेंज काय असते ते कळाले. त्यांनी आतापर्यंत जगातल्या ज्या काही अवघड खाडी पोहून विक्रम नोंदविला, त्याबद्दल मला खरंच त्यांचा खूप अभिमान वाटत आहे.- अबोली रोहन मोरे, पत्नी
रोहन मोरेने केला असोसिएशन सेव्हन खाडी पार करून विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 5:22 AM