ऑनलाइन लोकमतबर्मिंगहॅम, दि. 4 - एकीकडे एजबेस्टनच्या मैदानात सतत पावसाची रिमझिम सुरू असतानाच भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी नव्या विक्रमाची नोंद केली आहे. शिखर धवन आणि रोहित शर्माने शानदार शतकी भागिदारी रचत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. या शतकी भागिदारीसोबतच चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत तीन शतकी भागिदाऱ्यांची नोंद करणारी पहिली जोडी होण्याचा मान शिखर आणि रोहितने पटकावला आहे. याआधी कोणत्याही जोडीला अशी कमागिरी करता आलेली नाही.आजच्या सामन्यापूर्वी रोहित आणि धवनने 2013 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन वेळा शतकी भागिदारी केली होती. 2013 च्या स्पर्धेतील पुनरावर्ती होताना या सामन्यात दिसत आहे. पावसामुळे खेळपट्टी संथ झाली होती त्यामुळे चेंडू स्विंग होत होता. खेळपट्टीचा आढावा घेत दोन्ही सलामीविरांनी संयमी सुरुवात करत संघाची धावसंख्या वाढवली. रोहित-धवनने 147 चेंडूंमध्ये 136 धावांची भागिदारी रचत संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला. शिखरने 65 चेंडूंमध्ये 68 धावा केल्या. यामध्ये 6 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. रोहितनेही पाकिस्तानविरुद्ध आपली सर्वाधिक धावसंख्या नोंदवली. रोहितने या सामन्यात 91 धावांची खेळी केली.
चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित-धवनचा नवा विक्रम
By admin | Published: June 04, 2017 9:10 PM