मुंबई : भारतीय संघाचा फलंदाज रोहित शर्मा हा नवी दिल्लीत न्यूझीलंडविरुद्ध १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या तीन दिवसांच्या सराव सामन्यात मुंबई संघातून खेळणार आहे. १५ सदस्यांच्या रणजी विजेत्या मुंबई संघात रोहितचा समावेश करण्यात आला.दौऱ्यावर येत असलेला न्यूझीलंड संघ फिरोजशह कोटलावर मुंबईविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. मुंबई संघात अजिंक्य रहाणे मात्र खेळणार नाही. संघाचे नेतृत्व यष्टिरक्षक आदित्य तारेकडे असेल. मुंबई क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव आणि मुख्य निवडकर्ते उन्मेश खानविलकर यांनी ही माहिती दिली.न्यूझीलंडचे नेतृत्व केन विलियम्सन करणार आहे. पाहुणा संघ पुढील आठवड्यात भारतात दाखल होईल. न्यूझीलंडला भारताविरुद्ध २२ सप्टेंबरपासून २९ आॅक्टोबरपर्यंत तीन कसोटी आणि पाच वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिली कसोटी कानपूरच्या ग्रीनपार्कवर २२ सप्टेंबरपासून खेळली जाईल. (वृत्तसंस्था)मुंबई संघ :आदित्य तारे(कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, कौस्तुभ पवार, सूफियान शेख, अरमान जाफर, परिक्षित वळसांगकर, विशाल दाभोळकर, विजय गोहिल, बलविंदरसिंग संधू, तुषार देशपांडे, रॉयस्टन दियास, हर्षल सोनी.
रोहितचा मुंबई संघात समावेश
By admin | Published: September 09, 2016 12:27 AM