ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. २५ - नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पंजाब संघाने दमदार सुरवात केली. पहिल्याच षटकात संदीप शर्माने कर्णधार रोहित शर्माला बाद केले. शर्माने एकही धाव केली नाही. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा मुंबईने ४ षटकात १ बाद धावा १९ केल्या होत्या. पार्थिव पटेल १४ आणि रायडू ५ धावावर खेळत आहेत. पंजाबकडून संदीप शर्माने २ षटकात ५ धावांच्या मोबदल्या एका फलंदाजाला बाद केले.
गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेल्या किंग्ज इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याची निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजच्या लढतीत मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी करावी लागेल. देन्ही संघ विजयासाठी प्रयत्नशिल असतील. पंजाबने ५ सामन्यात एक विजय मिळवत गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. तर मुंबईसंघाची कामगीरीही फारशी चांगली नाही. मुंबईने ६ सामन्यात २ विजय मिळवले आहेत मुंबईच्या खात्यात ४ गुण जमा आहेत. गुणतालिकेत मुंबई ६व्या स्थानी आहे.
मुंबई इंडियन्सची या स्पर्धेतील कामगिरी संमिश्र ठरली आहे. मुंबई संघाने गृहमैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाब व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघांविरुद्ध विजय मिळवला असला तरी, त्यांना चार सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार करता किंग्ज इलेव्हन संघाची स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक आहे. या संघाला पाचपैकी केवळ एकाच लढतीत विजय मिळवता आला. आठ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत किंग्ज इलेव्हन संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाला रायझिंग पुणे सुपरजॉयन्ट्स, गुजरात लायन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघांविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
कर्णधार रोहित शर्माचा अपवाद वगळता मुंबईच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघव्यवस्थापनाने बंगळुरू व दिल्ली यांच्याविरुद्धच्या लढतींमध्ये त्याला संघात स्थान दिले नाही. मुंबई संघाची भिस्त अष्टपैलू किरॉन पोलार्डच्या कामगिरीवर अवलंबून आहे.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), पार्थिव पटेल, हार्दिक पंड्या, जोस बटलर, मिशेल मॅक्लेनघन, अंबाती रायडू, किरॉन पोलार्ड, हरभजन सिंग, टीम साऊदी, जसप्रीत बुमराह, कृणाल पंड्या.
किंग्ज इलेव्हन पंजाब : डेव्हिड मिलर (कर्णधार), मुरली विजय, मनन व्होरा, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, निखिल नायक, अक्षर पटेल, मिशेल जॉन्सन, मोहित शर्मा, प्रदीप साहू, संदीप शर्मा,