ऑनलाइन लोकमत -
मिरपूर, दि. २८ - भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज रोहीत शर्माच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एक्स-रे काढण्यात आला आहे. आशिया कप टी २० मध्ये शनिवारी झालेल्या भारत - पाकिस्तान मॅचदरम्यान ही दुखापत झाली आहे. मॅच सुरु झाल्यानंतर मोहम्मद आमीरने टाकलेला पहिलाच बॉल रोहितच्या डाव्या पायाला लागला होता ज्यामुळे ही दुखापत झाली आहे. सध्या एक्स-रे काढण्यात आला आहे, मात्र श्रीलंकेविरोधात मंगळवारी होणा-या मॅचमध्ये रोहीत शर्मा खेळणार की नाही याबद्दल अजून निर्णय झाला नाही आहे.