शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

रोहितचे शतक पुन्हा व्यर्थ

By admin | Published: January 16, 2016 1:08 AM

पुन्हा‘येरे माझ्या मागल्या’ या म्हणीची हुबेहूब प्रचिती दुसऱ्या वन डेतही आली. रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या बळावर शुक्रवारी भारताने तब्बल ३०८ धावा, तर उभारल्या; पण गोलंदाजांच्या

ब्रिस्बेन : पुन्हा‘येरे माझ्या मागल्या’ या म्हणीची हुबेहूब प्रचिती दुसऱ्या वन डेतही आली. रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या बळावर शुक्रवारी भारताने तब्बल ३०८ धावा, तर उभारल्या; पण गोलंदाजांच्या अपयशामुळे भारताने आॅस्ट्रेलियाला सात गड्यांंनी विजय बहाल केला. या विजयासह यजमान संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी मिळविली.प्रत्युत्तरात आॅस्ट्रेलियाने सलामीवीर अ‍ॅरोन फिंच ७१ व शॉन मार्श ७१ धावा ठोकल्यानंतर, पहिल्या सामन्यातील शतकवीर कर्णधार जॉर्ज बेली याने नाबाद ७६ धावा फटकावित एक ओव्हरआधीच केवळ तीन गडी गमावून सहज विजय गाठला. बेलीने ५८ चेंडूंत सहा चौकार आणि एक षटकार मारला. ग्लेग मॅक्सवेल २६ धावा काढून नाबाद राहिला. त्याआधी फिंच आणि मार्श यांनी दमदार सलामी देत १४५ धावा फळ्यावर लावल्या. पहिला बळी मिळविण्यासाठी भारतीय गोलंदाजांना २५ षटके संघर्ष करावा लागला. पर्थमध्ये शतक नोंदविणारा स्मिथ ४७ चेंडंूत ४६ धावांचे योगदान देत नाबाद राहिला. भारतीय खेळाडूंनी ढिसाळ क्षेत्ररक्षण केले. मार्शला तब्बल चारवेळा जीवदान मिळाले. रोहितचे शतक व्यर्थ गेले; पण तो सामनावीर ठरला. फिरकीपटू आश्विन आणि जडेजा यांनी निराशा केली. दुसरीकडे वेगवान गोलंदाजांनी टिच्चून मारा केला खरा, पण क्षेत्ररक्षकांनी त्यावर पाणी फेरले. भारतीय गोलंदाजांनी १९ अतिरिक्त धावा दिल्या. या धावा निर्णायक सिद्ध झाल्या. भारताने पहिल्या वन डेत ३१० धावा केल्या होत्या. त्या धावादेखील कमी पडल्या. आज गाबा मैदानावर भारताकडून ३०८ या तिसऱ्या सर्वोत्तम धावसंख्येची नोंद झाली; पण आॅस्ट्रेलियन फलंदाजांनी हे आव्हान लीलया गाठले. त्याआधी २८ वर्षांच्या रोहितने १२७ चेंडूंत ११ चौकार व तीन षटकारांसह १२४ धावा केल्या. विराटने ६७ चेंडूंत ३६ वे अर्धशतक ठोकले. रहाणेने ८० चेंडंूत सहा चौकार व एका षटकारासह ८९ धावांचे योगदान दिले.सचिन, लक्ष्मणचा रेकॉर्ड मोडला!रोहित शर्मा याने आॅस्ट्रेलियात सलग दुसरे वन डे शतक झळकवित सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मणचा विक्रम मोडित काढला आहे. रोहितने पर्थमध्ये १७१, तर ब्रिस्बेनमध्ये १२४ धावा केल्या. रोहितचे कारकिर्दीतील हे दहावे, आॅस्ट्रेलियाविरुद्ध पाचवे व आॅस्ट्रेलियातील हे चौथे शतक आहे.स्कोअर बोर्डवर आले क्लार्कचे नाव!दुसऱ्या वन डेत स्कोअर बोर्डवर चुकीने मायकेल क्लार्कचे नाव झळकताच उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. सामन्यादरम्यान ही चूक घडली; पण काही वेळातच ही चूक सुधारण्यात आली. या हास्यास्पद प्रकारानंतर क्लार्क ‘टिष्ट्वटर’वर म्हणाला,‘कभी अलविदा ना कहना! प्यारे गाबा’!लक्षवेधी१६ सलग विजय आॅस्ट्रेलियाने मायदेशात मिळवून विक्रमाची बरोबरी केली आहे. १९८६ ते १९९0 या कालावधीत वेस्ट इंडिजने मायदेशात सलग १६ विजय मिळवले होते. याशिवाय श्रीलंकाही या संयुक्त विक्रमाचा भागीदार आहे.३0१ धावांचा यापूर्वी ब्रिस्बेनमध्ये यशस्वीपणे पाठलाग झाला होता. आॅस्ट्रेलियाने इंग्लंडविरुध्द २0१३-१४ मध्ये ही कामगिरी केली होती. 0२ फलंदाजांनी आॅस्ट्रेलियाविरुध्द पाचहून अधिक शतकांची रोहीत शर्माच्या अगोदर नोंद केली आहे. सचिन तेंडुलकरने आॅस्ट्रेलियाविरुध्द ९ शतके केली आहेत, तर वेस्ट इंडिजच्या डेस्मंड हेन्स याने ६ शतके नोंदविली आहेत.0२ फलंदाजांनी रोहीत शर्माच्या अगोदर आॅस्ट्रेलियाविरुध्द आॅस्टे्रलियात सलग शतकांची नोंद केली. गॅ्रमी हिकने १९९८ मध्ये सिडनी आणि अ‍ॅडीलेड येथे तर व्हीव्हीएस लक्ष्मणने ब्रिस्बेन आणि सिडनी येथे २00३ मध्ये हा पराक्रम केला आहे.३0६ ही ब्रिस्बेनमधील पाहुण्या संघाने नोंदवलेली सर्वोच्च धावसंख्या होती. २0११-१२ मध्ये श्रीलंकेने ही मजल मारलेली.धावफलकभारत : रोहित शर्मा धावबाद १२४, शिखर धवन झे. वेड गो. पेरिस ६, विराट कोहली धावबाद ५९, अजिंक्य रहाणे झे. स्मिथ गो. फॉकनर ८९, महेंद्र धोनी झे. मॅक्सवेल गो. बोलँड ११, मनीष पांडे झे. पेरिस गो. फॉकनर ६, रवींद्र जडेजा धावबाद ५, आर. आश्विन झे. बोलँड गो. हेस्टिंग्ज १, उमेश यादव नाबाद ०, अवांतर : ७, एकूण : ५० षटकांत ८ बाद ३०८ धावा. गोलंदाजी : पेरिस ८-०-४०-१, रिचर्डसन ८-१-६१-०, हेस्टिंग्ज ८-०-४६-१, बोलँड १०-०-६४-१, मॅक्सवेल ६-०-३३-०, फॉकनर १०-०-६४-२.आॅस्ट्रेलिया : अ‍ॅरोन फिंच झे. रहाणे गो. जडेजा ७१, शॉन मार्श झे. कोहली गो. ईशांत ७१, स्टीव्ह स्मिथ त्रि. गो. यादव ४६, जॉर्ज बेली नाबाद ७६, ग्लेन मॅक्सवेल नाबाद २६, अवांतर : १९, एकूण : ४९ षटकांत ३ बाद ३०९ धावा. गडी बाद क्रम : १/१४५, २/१६६, ३/२४४. गोलंदाजी : सरन ९-१-५१-०, ईशांत १०-०-६०-१, यादव १०-०-७४-१, जडेजा ९-०-५०-१, आश्विन १०-०-६०-०, कोहली १-०-७-०.