ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 26 - पोर्तुगालचा कर्णधार आणि रियल माद्रिदचा स्टार स्ट्राइकर ख्रिस्तियानो रोनाल्डोला युरोपचा या वर्षातील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. रोनाल्डोच्या शानदार खेळामुळे रियल माद्रिदने २०१५-१६ मध्ये चॅम्पियन्स लीग किताब पटकावला. तर त्याच्याच नेतृत्वात पोर्तुगालने पहिल्यांदा युरो कप जिंकला आहे. चॅम्पियन्स लीगच्या येणाऱ्या सत्रातील ड्रॉच्या घोषणेनंतर त्याला युईएफए बेस्ट प्लेअरचा पुरस्कार घोषीत करण्यात आला. रोनाल्डोने हा पुरस्कार दुसऱ्यांदा पटकावला आहे. रोनाल्डो सोबतच या पुरस्काराच्या शर्यतीत रियल माद्रिदचा गॅरेथ बेल आणि अॅटलेटिको माद्रिदचा स्ट्राईकर एंटोनियो ग्रिझमन हा देखील होता. रोनाल्डोने या आधी २०१४ मध्ये हा पुरस्कार मिळवला होता. तर २०१५ मध्ये बार्सिलोनाचा स्टार स्ट्राईकर लियोनेल मेस्सीने मिळवला. महिलांच्या गटात नॉर्वेचा अदा हेगरबर्गला मिळाला. पुरस्कार मिळाल्यावर रोनाल्डो म्हणाला की, ‘‘ हा पुरस्कार मिळाल्यावर मी खूप खूश आहे. हे सत्र उत्तम होते. तसेच इतर दोन्ही खेळाडू देखील पुरस्काराचे दावेदार होते.’’ युएफाने ५५ सदस्य संघाच्या मतदानाद्वारे विजेत्याच्या नावाची घोषणा केली आहे.
रोनाल्डो दुसऱ्यांदा बनला युरोपचा सर्वश्रेष्ठ खेळाडू
By admin | Published: August 26, 2016 8:47 PM