शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

रोनाल्डोला ‘बॅलन डी ओर’ पुरस्कार

By admin | Published: January 14, 2015 2:28 AM

फुटबॉल विश्वातील दिग्गज पोर्तुगालचा ख्रिस्टियानो रोनाल्डो याने आपला निकटचा प्रतिस्पर्धी लियोनेल मेस्सी याला मागे टाकून सलग दुसऱ्यांदा फिफाचा ‘बॅलन डी ओर’ पुरस्कार पटकावला आहे.

झुरिच : फुटबॉल विश्वातील दिग्गज पोर्तुगालचा ख्रिस्टियानो रोनाल्डो याने आपला निकटचा प्रतिस्पर्धी लियोनेल मेस्सी याला मागे टाकून सलग दुसऱ्यांदा फिफाचा ‘बॅलन डी ओर’ पुरस्कार पटकावला आहे.रियल माद्रिदचा फॉरवर्ड रोनाल्डोने अर्जेंटिनाचा मेस्सी याच्या तुलनेत दुप्पट मते मिळविली. रोनाल्डोला एकूण तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. मेस्सी दुसऱ्या तर जर्मनीचा गोलकीपर मॅन्युएल नियुएर तिसऱ्या स्थानावर राहिला. पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंदी झालेला रोनाल्डो म्हणाला, ‘‘मी संघाचाच नव्हे, तर जागतिक फुटबॉलचा महान खेळाडू बनू इच्छितो.’’ गतवर्षी ब्राझीलमध्ये झालेल्या फिफा विश्वचषकात जर्मनीला जेतेपद मिळवून देणाऱ्या संघाचे प्रशिक्षक जोआकिम लू हे सर्वोत्कृष्ट कोच ठरले. त्यांनी रियल माद्रिदचे कार्लो एन्सेलोट्टी आणि अ‍ॅटलेटिको माद्रिदचे दिएगो सायमन यांना मागे टाकले. कोलंबियाचा जेम्स रॉड्रिग्ज याला विश्वचषकात उरुग्वेविरुद्ध केलेल्या अप्रतिम गोलसाठी पुस्कास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व्हीएफएल व्होल्फबर्ग आणि जर्मनीची नदाईन कॅसलेर यांना महिला ‘प्लेयर आॅफ द इयर’ पुरस्कार मिळाला.फिफा अ‍ॅवॉर्डमध्ये सर्वांच्या नजरा रोनाल्डोवर खिळलेल्या होत्या. त्याचा संघ पोर्तुगाल खराब कामगिरीनंतर विश्वचषकाच्या पहिल्याच फेरीत बाहेर पडला, तरीही रोनाल्डोने हा पुरस्कार कायम राखण्यात यश संपादन केले. जगातील २०९ राष्ट्रीय संघांचे कोच, कर्णधार, प्रत्येक देशातील एक पत्रकार यांनी यासाठी मतदान केले. झुरिचमध्ये दोन तास चाललेल्या पुरस्कार सोहळ्यादरम्यान रोनाल्डो म्हणाला, ‘‘तीनवेळा ही ट्रॉफी घरी घेऊन जाईन, असा कधी विचारही केला नव्हता. आता वारंवार ट्रॉफी जिंकायची आहे. जगातील महान खेळाडूंमध्ये स्थान मिळवायची इच्छा आहे.’’ बॅलन डी ओर अ‍ॅवॉर्डचे वैशिष्ट्य असे, की काही वर्षांपासून या पुरस्कारासाठी रोनाल्डो आणि मेस्सी यांच्यातच चढाओढ गाजत आहे. २००८, २०१३ आणि २०१४मध्ये रोनाल्डोने बाजी मारली.मेस्सीनेदेखील चार वेळा हा पुरस्कार जिंकला. त्याला २००९ ते २०१२ असा सलग फिफाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू घोषित करण्यात आले. या वेळी रोनाल्डो दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर राहिला होता. गेल्या मोसमात रियल माद्रिदकडून रोनाल्डोने ४७ सामन्यांत ५१ गोल केले. यामुळे रियल माद्रिद चॅम्पियन्स लीग आणि किंग्स कप जिंकू शकला. रोनाल्डोने चॅम्पियन्स लीगमध्ये क्लबसाठी १७ गोल, तर ला लीगाच्या १७ सामन्यांत २६ गोल नोंदविले. एकूण ५२ गोलसह तो पोर्तुगालचा सर्वाधिक गोल नोंदविणारा खेळाडू ठरला आहे. (वृत्तसंस्था)