शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

आजपासून ‘रन’संग्राम

By admin | Published: February 24, 2016 3:43 AM

रणजी स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मुंबई व सौराष्ट्र संघांत बुधवारपासून (दि. २४) विजेतेपदाची लढत होत आहे. क्रिकेटप्रेमींना या ‘रन’संग्रामाचा

पुणे : रणजी स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मुंबई व सौराष्ट्र संघांत बुधवारपासून (दि. २४) विजेतेपदाची लढत होत आहे. क्रिकेटप्रेमींना या ‘रन’संग्रामाचा आस्वाद विनामूल्य घेता येणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होत आहे. मुंबईचा संघ ४५ व्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. सौराष्ट्राचा संघ दुसऱ्यांचा अंतिम फेरीत स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. हे दोन संघ २०१२-१३ मध्ये अंतिम फेरीत समोरासमोर आले होते. त्यात मुंबईने सौराष्ट्रला एक डाव व १२५ धावांनी पराभूत करीत ४० वा किताब नावावर केला होता. मुंबईने उपांत्य फेरीत पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर मुंबईने मध्य प्रदेश संघाला मात दिली होती. सौराष्ट्र संघाने आसाम संघावर तिसऱ्या दिवशी १० गडी राखून विजय मिळविला. त्यामुळे सौराष्ट्र संघ चांगली लढत देईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. रणजीच्या ८२ वर्षांच्या इतिहासात मुंबईने ४० वेळा किताब नावावर केला आहे. चार वेळा ते उपविजेते राहिले आहेत. मुंबई १९९१ नंतर खेळलेल्या दहा अंतिम सामन्यांत एकदाही हरलेली नाही. मुंबईची मदार ही फलंदाजांवर असेल. श्रेयस अय्यरने या मोसमात दहा सामन्यांत ३ शतके व ७ अर्धशतकांच्या सहाय्याने १ हजार २०४ धावांची खेळी केली आहे. अखिल हेरवाडकर (८७९), सूर्यकुमार यादव (७४०), सिद्धेश लाड (६०३) व कर्णधार आदित्य तारे (५५०) अशी भक्कम फलंदाजांची फळी मुंबईकडे आहे. सौराष्ट्रचा जलदगती गोलंदाज जयदेव उनाडकट बहरात असून, त्याच्या नावावर २० बळी आहेत. त्याने उपांत्यपूर्व फेरीत ७० धावांत व २५ धावांत प्रत्येकी ५ बळी घेतले होते. उपांत्य सामन्यांत ७७ धावांत ६ व ४५ धावांत ५ बळी टिपले आहेत. याशिवाय चेतेश्वर पुजाराने उपांत्य फेरीत शतकी खेळी केली होती. शेल्डन जॅक्सन (५२५), सागर जोगियानी (४७४) देखील चांगले बहरात आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)मुंबई : आदित्य तारे (कर्णधार-यष्टीरक्षक), सुर्यकुमार यादव, अभिषेक नायर, अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, निखिल पाटील, शार्दुल ठाकुर, सिद्धेश लाड, धवल कुलकर्णी, विशाल दाभोलकर, इक्बाल अब्दुल्ला, बद्रे आलम, भाविन ठक्कर, सुफियान शेख, बलविंदर सिंग संधु.सौराष्ट्र : जयदेव शहा (कर्णधार), शेल्डन जॅक्सन, अवि बारोत, चेतेश्वर पुजारा, चिराग जानी, जयदेव उनादकट, प्रेरक मनजाद, कमलेश मकवाना, धर्मेंद्रसिंह जडेजा, वंदित जीवराजानी, अर्पित वासवदा, दिपक पुनिया, हार्दिक राठोड, मोहसिन दोडिया, सागर जोगियानी (यष्टीरक्षक).श्रेयस अय्यर बाराशे धावांच्या घरात मुंबईचा श्रेयस अय्यर (१ हजार २०४) हा एकाच मोसमात १२०० हून अधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी केदार जाधव (१२२३), वसीम जाफर (१२६०), विजय भारद्वाज (१२८०) व व्हीव्हीएस लक्ष्मण (१४१५) या खेळाडूंचा समावेश आहे.