एंटवर्प : भारतीय हॉकी महिला संघाने हॉकी वर्ल्ड लीगच्या पहिल्या दोन लढतींत विजय मिळविला असला, तरी प्रशिक्षक पॉल वॉन एस यांनी आज दुखापतीमुळे ड्रॅगफ्लिकर रूपिंदरपाल सिंहच्या अनुपस्थितीत संघाला पेनल्टी कॉर्नरशी संबंधित मुद्द्यांशी संघर्ष करावा लागत असल्याचे मान्य केले आहे.फ्रान्स आणि पोलंडविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांत भारताचे पेनल्टी कॉर्नरविषयीचे प्रयत्न अपयशी ठरले. तथापि, रूपिंदरच्या जागेवर आलेल्या मनप्रीतसिंहने पहिल्या सामन्यात एक गोल केला.वॉन एस म्हणाले, ‘‘आम्ही पेनल्टी कॉर्नर मुद्द्यावर सध्या थोडे कमजोर आहोत. रूपिंदर तंदुरुस्त नाही आणि आम्ही पहिल्या दोन्ही सामन्यात त्याच्याशिवाय खेळलो.’’ रूपिंदरला एंटवर्प येथे सरावादरम्यान दुखापत झाली होती. त्याला व्ही. आर. रघुनाथच्या जागी संघात स्थान देण्यात आले होते. रूपिंदरने काल भारतीय संघासोबत सराव केला. त्यामुळे तो पाकिस्तानविरुद्ध शुक्रवारी होणाऱ्या पुढील समन्यात खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.प्रशिक्षकांनी रूपिंदर पुढील सामन्यात खेळण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.प्रशिक्षक वॉन यांनी रघुनाथला संघात न घेता फक्त ड्रॅग फ्लिकर रूपिंदरचा समावेश केला होता. नवी व्यूहरचना कार्यान्वित करण्यासाठी ही वेळ असल्याचे प्रशिक्षकांना वाटत होते. भारतीय संघ रियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरल्यामुळे प्रशिक्षकांना हे स्वातंत्र्य देण्यात आले. एस पेनल्टी कॉर्नरमध्ये पर्याय वाढवू इच्छितात. दोन्ही ड्रॅग फ्लिकर यांच्या अनुपस्थितीत भारताजवळ पेनल्टी कॉर्नरची उणीव भासू नये, अशी त्यांची इच्छा आहे. (वृत्तसंस्था)
रूपिंदरची भासतेय उणीव : हॉकी प्रशिक्षक
By admin | Published: June 24, 2015 11:33 PM