Russia Ukraine War Crisis, Olympics : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) कार्यकारी मंडळाने (EB) सोमवारी बैठकीत चर्चा करून रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंना दणका दिला. ऑलिम्पिक मोहिमे अंतर्गत काही नियमांचा करार केला जातो. त्या कराराचा व नियमांचा भंग करत रशियन सरकारने युक्रेनवर लष्करी चढाई केली. आणि रशियाला बेलारूसने दिलेल्या पाठिंब्यामुळे या दोन्ही देशांच्या खेळाडूंवर आगामी ऑलिम्पिकसाठी बंदी घालावी, अशी शिफारस एका विनंती पत्रकाच्या माध्यमातून कार्यकारी मंडळाने ऑलिम्पिक समितीकडे केलं आहे.
जागतिक क्रीडा स्पर्धांच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आणि सर्व सहभागी खेळाडूंच्या सुरक्षेसाठी, IOC EB ने शिफारस केली आहे की आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि क्रीडा स्पर्धा आयोजकांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये रशियन आणि बेलारूसच्या खेळाडू आणि अधिकारी यांच्या सहभागास परवानगी देऊ नये.
"काही कायदेशीर कारणांमुळे अल्प काळच्या सूचनेवर थेट बंदी घालणं शक्य होणार नसल्याने IOC EB तर्फे आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि जगभरातील क्रीडा स्पर्धांच्या आयोजकांना आवाहन करतो की रशिया किंवा बेलारूसमधील कोणत्याही खेळाडूला कोणत्याही क्रीडा स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी शक्य ते सारं काही करावे. रशिया किंवा बेलारूसच्या खेळाडूंना जर स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी त्यांच्या देशांच्या नावाखाली सहभाग पत्र भरू नये. दोन्ही देशांची कोणतीही राष्ट्रीय चिन्हे, रंग, ध्वज किंवा राष्ट्रगीत वाजवलं जाऊ नयेत", असं IOC ने प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे.