Russia Ukraine War, Emotional Moment : प्लीज, युद्ध थांबवा...; फुटबॉलच्या चालू सामन्यात खेळाडूची हात जोडून भावनिक विनंती (Viral Video)

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 04:45 PM2022-02-25T16:45:50+5:302022-02-25T16:47:02+5:30

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात जनसामान्यांचे हाल होत आहेत

Russia Ukraine War Emotional Video from Football Match Ruslan Malinovskyi celebrates two goals with anti war vest jersey celebration viral | Russia Ukraine War, Emotional Moment : प्लीज, युद्ध थांबवा...; फुटबॉलच्या चालू सामन्यात खेळाडूची हात जोडून भावनिक विनंती (Viral Video)

Russia Ukraine War, Emotional Moment : प्लीज, युद्ध थांबवा...; फुटबॉलच्या चालू सामन्यात खेळाडूची हात जोडून भावनिक विनंती (Viral Video)

Next

Russia Ukraine War, Emotional Moment : रशिया आणि युक्रेन यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. गुरुवारी रशियाने युक्रेनवर हल्ला केला, त्या विरोधात जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र बहुतांश लोक शांततेच्या मार्गाने वाद मिटवण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. क्रीडा क्षेत्रातील मान्यवरही हे युद्ध संपवण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. युरोपा लीगमध्ये गुरुवारी रात्री युक्रेनच्या एका फुटबॉलपटूने खास पद्धतीने हे संहारक युद्ध टाळण्याचे आवाहन केले.

इटालियन फुटबॉल संघ अटलांटा बी.सी.चा युक्रेनियन मिडफिल्डर रुस्लान मालिनोव्स्की याने ऑलिंपियाकोस संघाविरुद्ध गोल केल्यानंतर सेलिब्रेशन केलं. पण ते सेलिब्रेशन फारच भावनिक प्रकारचं असल्याचं दिसून आलं. त्याने गोल केल्यानंतर त्याचा जर्सी टी-शर्ट वर केला. त्याच्या टी-शर्टच्या आत घातलेल्या दुसऱ्या शर्टवर लिहिले होते की, 'युक्रेन युद्ध नको' (No War in Ukraine). या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

दरम्यान, ऑलिम्पियाकोस विरुद्धच्या या दुसऱ्या लेगच्या सामन्यात मालिनॉव्स्कीने दोन गोल केले. तर डेन्मार्कच्या जोकिम माहेलेने एक गोल केला. अटलांटा बी.सी.ने युरोपा लीगच्या पहिल्या लेगच्या सामन्यात ग्रीक क्लब ऑलिम्पियाकोसचा २-१ असा पराभव केला होता. आता गुरुवारी झालेल्या दुसऱ्या लेगच्या सामन्यात अटलांटा बी.सी.ने ऑलिम्पियाकोसचा ३-० असा पराभव करत अंतिम १६च्या फेरीत प्रवेश केला.

Web Title: Russia Ukraine War Emotional Video from Football Match Ruslan Malinovskyi celebrates two goals with anti war vest jersey celebration viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.