कोलंबो : विक्रमवीर फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या युगाचे प्रतिनिधित्व करताना जवळजवळ सर्वंच विक्रमांना गवसणी घातली असली, तरी श्रीलंकेचा माजी दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज कुमार संघकाराने त्याला आपल्या सर्वकालिक महान खेळाडूंच्या यादीत स्थान दिलेले नाही. श्रीलंकेचा माजी कर्णधार संघकाराने टिष्ट्वटरवर पोस्ट केलेल्या सर्वकालिक महान खेळाडूंच्या इलेव्हनमध्ये एकमेव भारतीय खेळाडू राहुल द्रविडचा समावेश आहे. या इलेव्हनमध्ये सचिनला स्थान न देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके ठोकणारा व २०० कसोटी सामने खेळणाऱ्या सचिनला या यादीत स्थान न मिळणे आश्चर्यचकित करणारे आहे. राहुलला आॅस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनच्या साथीने सलामीवीर म्हणून स्थान देण्यात आले आहे. श्रीलंकेचा माजी आक्रमक फलंदाज अरविंद डिसिल्वा याला कर्णधार म्हणून स्थान देण्यात आले असून, विंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लारा व आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग फलंदाजी क्रमामध्ये अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहेत.
संघकाराच्या ‘आॅल टाइम’ इलेव्हनमध्ये सचिनला स्थान नाही
By admin | Published: June 29, 2016 5:50 AM