मेलबर्न : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी क्रिकेट चाहत्यांच्या मनावर आजही तो राज्य करीत आहे. याची प्रचीती आज मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर आली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना पाहण्यासाठी तो स्टेडियमवर येताच सचिन...सचिन...असा जयघोष सुरू झाला. हा आवाज स्टेडिमवर बराच वेळ गुंजत होता. निवृत्तीनंतर प्रत्यक्ष सामना बघण्याची ही सचिनची पहिलीच वेळ असेल आणि त्यामुळेच चाहत्यांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला. सचिन तेंडुलकर हा विश्वचषकाचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्यामुळे तो सुरक्षेच्या गराड्यातच आयसीसीच्या अतिथी कक्षात गेला.तो आल्याची माहिती अनेकांना नव्हती; पण आयसीसीच्या मोठ्या स्क्रीनवर त्याला चाहत्यांनी पाहिले. तेव्हा त्यांच्यात प्रचंड उत्साह संचारला. सचिन...सचिन...हा जयघोष थांबता थांबेना. असे वाटत होते की, सचिनने निवृत्ती घेतलेलीच नाही. विश्वचषक सचिनसाठी खूप महत्त्वाचा आहे; कारण १९८७ मध्ये त्याने बॉल बॉय म्हणून भूमिका निभावली होती. त्यानंतर तो सलग सहा विश्वचषक खेळला आणि त्याच्या प्रतिनिधित्वात भारताने २०११चा विश्वचषकही जिंकला.
सचिन... सचिन.... चा जयघोष
By admin | Published: February 23, 2015 1:17 AM