ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 18 - भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज होत असलेल्या ओव्हल मैदानावरील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जगभरातून प्रेक्षक श्वास रोखून पाहतील. विशेष म्हणजे क्रिकेट चाहत्यांसह या सामन्यामुळे क्रिकेटचा देव समजल्या जाणा-या सचिन तेंडुलकरच्या हृदयाचीही धडधड वाढली आहे. या सामन्यात भारत पाकिस्तानवर भारी पडेल, अशी शक्यता सचिन तेंडुलकरनं वर्तवली आहे. पाकिस्तानच्या विरोधात अनेक सामन्यांत भारताला विजय मिळवून दिलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही या सामन्याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सचिन म्हणाला, जगभरात ज्या पद्धतीनं लोकांना या सामन्याची उत्कंठा लागली आहे, त्याप्रमाणेच मीसुद्धा या सामन्याची वाट पाहतो आहे. पाकिस्तानविरोधातल्या महामुकाबल्यात भारताचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. माझी इच्छा आहे की, भारतानं चांगलं खेळावं. जेणेकरून सामन्यानंतर आपण सर्व मिळून जल्लोष करू. क्रिकेटच्या देवानं या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत विराट कोहलीनं कर्णधार म्हणून निभावलेल्या भूमिकेसह इतरही खेळाडूंच्या प्रदर्शनाची प्रशंसा केली आहे. (भारत-पाकिस्तान क्रिकेट सीरीजबद्दल काय म्हणाले अमित शहा)(पाकिस्तान : बेभरवशाचा आणि धोकादायक! )सचिन म्हणाला, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत विराट कोहलीचं नेतृत्व जबरदस्त राहिलं आहे. विराटसह रोहित शर्मा आणि शिखर धवननंही चांगली फलंदाजी केली आहे. युवराज सिंगनेही शानदार खेळाचा नजराणा पेश केला होता. वेगवान गोलंदाजांनीही भेदक चेंडू टाकले होते. तर फिरकी गोलंदाजांनीही चांगलं प्रदर्शन केलं आहे. आता बस्स, आजही यांनी असंच प्रदर्शन करावं. आपण एक अभेद्य टीम आहोत. मास्टर ब्लास्टरच्या मते, भारतीय संघ या सामन्यात पूर्ण तयारीनिशी उतरला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत भारतानं चांगला खेळ केला आहे. पाकिस्तान संघाची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली नसल्यानं भारत नक्कीच वरचढ ठरेल, असंही भाकित सचिन तेंडुलकरनं केलं आहे.
महामुकाबल्यासाठी भारत-पाक संघाला सचिननं दिला सल्ला
By admin | Published: June 18, 2017 1:50 PM