Sachin Tendulkar on Rafael Nadal, French Open 2022: स्पेनचा स्टार टेनिसपटूराफेल नदाल पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्याने फ्रेंच ओपन २०२२ मध्ये पुरूष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. शुक्रवारी नदालचा उपांत्य सामना जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हशी झाला. हा सामना अतिशय रोमांचक होता. पण दुर्दैवाने, सामन्याच्या मध्येच झ्वेरेवचा पाय सरकला, तो जमिनीवर पडला आणि जखमी झाला. यानंतर त्याना व्हिलचेअरवर बसवून बाहेर नेण्यात आले. या घटनेनंतर त्याला खेळणं शक्य नव्हतं. झ्वेरेव्ह कोर्टवर परतू शकला नाही आणि त्यामुळे नदालला अंतिम फेरीचे तिकीट मिळाले.
राफेल नदाल आणि झ्वेरेव यांच्यात जेव्हा सामना सुरू होता त्याचवेळी झ्वेरेवचा पाय सरकला. तो जमिनीवर कोसळला आणि वेदनेमुळे जोरजोरात आक्रोश करू लागला. त्यानंतर त्याला प्रथमोपचारासाठी टेनिस कोर्टवरून बाहेर नेण्यात आले. बऱ्याच वेळाने जेव्हा तो कोर्टवर परतला तेव्हा तो काठी घेऊन चालत होता. त्याने सामन्यातून माघार घेतली होती. त्यावेळी नदालला अंतिम फेरीचं तिकीट मिळालं. पण नदाल त्याबद्दलचा जल्लोष करत बसला नाही. त्याने झ्वेरेवला सहानुभूती दाखवली आणि त्याच्यासोबत तो चालत राहिला. म्हणूनच सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांनी त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली.
नक्की काय घडलं?
सामन्यातील पहिला सेट नदालने टायब्रेकरमध्ये 7-6 असा जिंकला. नदाल आणि झ्वेरेव्ह यांच्यात ६-६ अशी बरोबरी झाल्यानंतर दुसरा सेटही टायब्रेकरमध्ये गेला. त्याचदरम्यान, झ्वेरेव चेंडू घेत असताना त्याचा पाय घसरला आणि तो पडला. त्याला तातडीने बाहेर काढण्यात आले. काही वेळाने झ्वेरेव्हने पुनरागमन केले, मात्र तो कुबड्यांच्या मदतीने आला. झ्वेरेव्हची ती अवस्था पाहून त्याच्या झुंजारवृत्तीला चाहत्यांना अभिवादन केले. चाहत्यांनी उभे राहून झ्वेरेवचे कौतुकही केले आणि त्याला प्रोत्साहन दिले. त्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.