सिडनी : चॅम्पियन क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न अमेरिकेत होणाऱ्या एका टी- २0 लीग प्रोजेक्टसाठी एकत्र येणार आहे. या लीगमध्ये अनेक माजी दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत.तेंडुलकर आणि वॉर्न यांनी २८ माजी खेळाडूंना कराराचा प्रस्ताव दिला आहे. त्यांना प्रत्येक सामन्यासाठी २५000 डॉलर मिळतील. ‘द आॅस्ट्रेलियन’नुसार ही लीग सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील तीन शहरांत खेळवली जाणार आहे.खेळाडूंना साडेतीन वर्षांच्या कालावधीत १५ टी-२0 सामने खेळावे लागतील. हे सामने न्यूयॉर्क, लॉस एंजिल्स आणि शिकागो येथे खेळवले जाणार आहेत. या खेळाडूंत आॅस्ट्रेलियाचा ब्रेट ली, रिकी पाँटिंग, अॅडम गिलख्रिस्ट, ग्लेन मॅकग्रा, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन, अँड्र्यू फ्लिन्टॉफ, दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिस यांचा समावेश आहे. खेळाडूंना एका पानाचा करार देण्यात आला आहे. त्यात पॅकेजविषयी तपशील देण्यात आला. करारात बिझनेस क्लास प्रवास आणि १0000 डॉलर कराराच्या वेळेसच्या रकमेचा समावेश आहे.
माजी दिग्गजांसोबत करणार सचिन, वॉर्न करार
By admin | Published: May 16, 2015 2:24 AM