ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कप्तान विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा आयपीएलमधील विक्रम तोडला आहे. विराट कोहलीने शनिवारी पुण्याविरोधात झालेल्या सामन्यात शतक पुर्ण करत 500 धावाही पुर्ण केल्या आहेत. यामुळे आयपीएलच्या तिन मोसमात 500 धावांचा टप्पा करणारा विराट कोहली पहिला कप्तान ठरला आहे. विराट कोहलीला 500 धावा पुर्ण करण्यासाठी 67 धावांची गरज होती. सचिन तेंडुलकरने हा विक्रम मुंबई इंडियन्ससाठी दोन आयपीएलमध्ये केला होता.
विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे त्यामुळे सचिनचा हा विक्रम तो सहज मोडेल असं म्हणण्यात येतं होत. त्याप्रमाणे विराट कोहलीने साखळी सामन्यांमधील अजून 4 सामने बाकी असतानाच 500 धावांचा टप्पा पुर्ण करत विक्रमाला गवसणी घातली आहे. या आयपीएलमध्ये सगळ्यात जास्त धावा कोहलीच्या नावे असून तो ऑरेंज कॅपधारक आहे.
सचिनने 2010मध्ये 618 व 2011मध्ये 553 दावा केल्या होत्या. तर कोहलीने 2013मध्ये 634 व 2015मध्ये 505 धावा केल्या होत्या.
आयपीएलमध्ये कप्तानानं सगळ्यात जास्त धावा करण्याचा विक्रम 634 धावांसह कोहलीच्याच नावावर आहे. आता यंदा तो कदाचित नवा विक्रम प्रस्थापित करेल. याखेरीज गौतम गंभीर व डेविड वॉर्नर या अन्य दोन कप्तानांनी 500 चा टप्पा पार केला आहे.