आंतरराष्ट्रीय पंच व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे संयुक्त सचिव जनार्धन संगम यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांनी खेळाडू म्हणून नेव्हल डॉकयार्डचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु नंतर खेळापेक्षा संघटनेत काम करण्यास त्यांनी अधिक पसंती दिली.
१९९२ ते २०१९ जवळपास २७ वर्षे ते महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या कार्यकारिणीवर संयुक्त सचिव म्हणून काम करत होते. त्यापेक्षाही वृत्तपत्राद्वारे व क्रीडा वाहिन्यांद्वारे खेळाच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी दिलेले योगदान फार मोठे आहे. मीत भाषी स्वभावामुळे सर्व पत्रकारांशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे कॅरमचे फार मोठे नुकसान झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
मानलं तुम्हाला; रितेश देशमुख आणि जेनेलियाचा अवयवदानाचा संकल्प!
कोरोनामुक्त होताच शाहिद आफ्रिदी काश्मीर मुद्द्यावर बरळला; केलं मोठं विधान
Cricket is Back: जेम्स अँडरसननं घेतली विकेट अन् खेळाडूंचं सोशल डिस्टन्सिंग सेलिब्रेशन
न्यूड फोटो शेअर करणाऱ्या महिला खेळाडूवर कारवाई; म्हणाली, स्वातंत्र्यावर घाला!
Video : ... म्हणून अजिंक्य रहाणेनं मानले सरकारचे आभार, शेतकऱ्यांबद्दल काढले गौरवौद्गार
धक्कादायक: यूनिस खाननं पाकिस्तानच्या फलंदाजी प्रशिक्षकाच्या गळ्यावर धरला होता चाकू