ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - क्रिकेटर झहीर खाननं "चक दे फेम" अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत साखरपुडा केल्याची गोड बातमी सोमवारी सोशल मीडियावर शेअर केली. यानंतर झहीर आणि सागरिकाला सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः पूर आला.
मात्र, शुभेच्छा देण्यात आलेल्या एका ट्विटला उत्तर देताना, सागरिका म्हणाली की..."मी तर दोन मुलांची आई आहे."
सागरिकाच्या ट्विटमुळे तुमचा गोंधळ उडला आहे का ?... तर जरा थांबा... सागरिका खरंच दोन मुलांची आहे. पण ही अभिनेत्री "सागरिका घाटगे" नसून महिला पत्रकार "सागरिका घोष" या आहेत. सागरिका घोष यांच्या या ट्विटमागील कारण आहे क्रिकेटर अनिल कुंबळे
त्याचं झालं असं की, ब-याच जणांनी सागरिका-झहीरला शुभेच्छा देताना "सागरिका घोष" यांना टॅग केले आणि याची सुरुवात केली अनिल कुंबळेनं.
अनिल कुंबळेनंही झहीर आणि सागरिकाला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या. मात्र यावेळी त्याचा पुरता गोंधळ उडाला.
झहीर-सागरिकाला ट्विटरवर शुभेच्छा देताना त्यानं चुकून पत्रकार सागरिका घोष यांना टॅग केलं. मात्र चूक लक्षात आल्यानंतर त्यानं आपले ट्विट डिलीट करत पुन्हा नव्यानं दुसरे ट्विट केले आणि यात त्यानं अभिनेत्री सागरिका घाटगेला टॅग केले.
आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स टीमनंही कर्णधार झहीर खानला सोशल मीडियावर साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या. मात्र त्यांनीही कुंबळेप्रमाणेच चूक करत पत्रकार सागरिका घोष यांना ट्विटमध्ये टॅग केले. यावेळी, सागरिका घोष यांनी रिट्विट करत त्यांना सांगितले की, "उप्स... चुकीची सागरिका सर. मी दोन मुलांची आई आहे."
oops wrong Sagarika, sirs! Main do bachche ki ma hoon