शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सायनाची आयओसीच्या सदस्यपदी निवड हुकली

By admin | Published: August 19, 2016 11:01 PM

दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालची आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीच्या चार सदस्यांमध्ये निवड होऊ शकली नाही.

ऑनलाइन लोकमतरिओ, दि . १९ : दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालची आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीच्या चार सदस्यांमध्ये निवड होऊ शकली नाही. कारण विश्व अ‍ॅथ्लेटिक्स आयोगाच्या शर्यतीत ती सहाव्या स्थानावर राहिली. सायनाला एकूण १२३३ मते मिळाली. रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना मत देण्याचा अधिकार होता. चार जागांसाठी जगभरातून नामांकितकरण्यात आलेल्या २३ खेळाडूंमध्ये सायनाचा समावेश होता.

लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची मानकरी ठरलेल्या सायनाना महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या गट साखळीतच पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे रिओ आॅलिम्पिकमधून सायनाचे आव्हान संपुष्टात आले. ही निवडणूक आॅलिम्पिक क्रीडा ग्राममध्ये २५ दिवसांमध्ये संपन्न झाली. 

आयओसी सत्राच्या मंजुरीनंतर चार खेळाडूंची आठ वर्षांसाठी आयओसीच्या सदस्यपदी निवड होईल. बीजिंग आॅलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता जर्मनीचा ब्रिट्टा हेडमॅनला १६०३, दक्षिण कोरियाचा दिग्गज टेबल टेनिसपटू सियोंग-मिन-रयूला १५४४, हंगेरीचा माजी जलतरणपटू डॅनियल ग्युर्टाला १४६९ आणि रशियाच्या येलेना इसिनबायेवाला १३६५ असे मते मिळाली. या सर्वांची आयओसीच्या सदस्यपदी निवड झाली. रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या ११,२४५ खेळाडूंपैकी ५,१८५ खेळाडूमतदानामध्ये सहभागी झाले