नवी दिल्ली : क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी त्यांच्या मंत्रालयास पद्मभूषणासाठी बॅडमिंटन तारका सायना नेहवालचा नामांकनासाठीचा अर्ज शनिवारी भेटल्याचे स्पष्ट केले. असे असले तरी पुरस्कारासाठी तिच्या नावाची शिफारस करण्याच्या शक्यतेवर विचार केला जाईल, असेही त्यांनी म्हटले.सायना नेहवाल हिने भारतीय बॅडमिंटन महासंघाने गतवर्षी आॅगस्ट महिन्यात पद्मभूषणासाठी तिच्या नावाची शिफारस केली होती असे शनिवारी म्हटले होते; परंतु क्रीडा मंत्रालयाने नियमांचा हवाला देत तिचा अर्ज रद्द केला होता.सोनोवाल म्हणाले, सायना नेहवालच्या नावाची शिफारस पद्मभूषणासाठी करण्यात आली नसल्याचे वृत्त मी प्रसिद्धीमाध्यमांत पाहिले आहे. तथापि, चौकशीअंती क्रीडा मंत्रालयास ३ जानेवारी २0१५ आधी भारतीय बॅडमिंटन महासंघाकडून कोणतेही नामांकन मिळाले नव्हते. माझ्या घरी स्टाफला ३ जानेवारी रोजी एक पाकीट मिळाले होते. त्यात सायनाला पद्मभूषणासाठी नामांकन मिळण्याविषयीचे ९ आॅगस्ट २0१४ चे पत्र होते. (वृत्तसंस्था)
सायनाचा अर्ज शनिवारी मिळाला : क्रीडामंत्री
By admin | Published: January 05, 2015 3:14 AM