शाह आलम : मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची बॅटमिंटनपटू सायना नेहवाल हिला उपांत्य फेरीत चिनी ताइपेईच्या तेइ जू यिंग हिच्याकडून पुन्हा पराभव स्वीकारावा लागला. सायना यिंगकडून १२ पैकी ७ सामन्यांत पराभूत झाली आहे. या सामन्यात यिंगने सायनावर २१-१९, २१-१३ असा विजय मिळवीत अंतिम फेरी गाठली. स्विस ओपन व इंडियन ओपन सुपर सीरिजनंतर सायना सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीतून बाहेर पडली आहे. आता सायना १२ एप्रिलपासून सिंगापूर ओपनमध्ये खेळेल. सायना अजूनही घोट्याच्या दुखापतीपासून पूर्णपणे सावरली नसल्याचे या सामन्यादरम्यान समोर आले. यिंगने जोरदार फटके मारत सायनावर दबाव टाकला. एकवेळ सायना ०-७ अशी मागे होती. त्यानंतर तिने ६-१३ अशी पिछाडी कमी केली. सायनाने केलेल्या काही चुकांचादेखील फायदा यिंगला झाला. यिंगने जोरदार फटके मारत सायनाला जेरीस आणले.
सायना पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2016 3:30 AM