सरावक : आघाडीची खेळाडू सायना नेहवाल तसेच अजय जयराम यांनी बुधवारी महिला आणि पुरुष गटात विजयाची नोंद करीत मलेशियन मास्टर्स ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. अव्वल मानांकित सायनाने गुडघ्याची शस्त्रक्रिया केल्यानंतर आत्मविश्वासाने कोर्टवर पुनरागमन केले. पुढे पाऊल टाकण्यासाठी तिला एकेक विजय हवा आहे. तिने थायलंडची चासिनी कोरेपाप हिच्यावर एकतर्फी लढतीत २१-९, २१-८ ने विजय साजरा केला. मागच्या वर्षी आॅस्ट्रेलियान ओपन जिंकणारी २६ वर्षांची सायना रिओ आॅलिम्पिकच्या पहिल्याच फेरीत पराभूत झाली होती. सायनाची गाठ आता हन्ना रामदिनी हिच्याविरुद्ध पडणार आहे. सहावा मानांकित जयराम प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये दिसला. त्याने पहिल्या सामन्यात मलेशियाचा हाओ लियोंग याचा २१-१०, १७-२१, २१-१४ ने पराभव केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंडोनेशियाचा विकी एंगा याच्यावर २१-९, २१-१२ ने विजय साजरा केला. जागतिक क्रमवारीत २१ व्या स्थानावर असलेल्या जयरामला आता चिनी तायपेईचा सुए सुआनविरुद्ध सामना खेळायचा आहे.हेमंत गौडा याला पुरुष एकेरीच्या अन्य लढतीत चून वेई चेन याच्याकडून ५-२१, १९-२१ ने पराभवाचा सामना करावा लागला. मिश्र दुहेरीत मन्नू अत्री-ज्वाला गुट्टा यांच्या भारतीय जोडीने लुखी नुगोहो- रिरिन अमेलिया या इंडोनेशियाच्या जोडीचा २१-१९, २१-१८ ने पराभव केला. अपर्णा बालन-प्राजक्ता सावंत या महिला जोडीने इंडोनेशियाची जोडी एगिस्रा फाथकूल-प्रिलसासी वारिएला यांच्यावर २१-१०, २१-११ ने विजय साजरा केला. प्राजक्ताने मलेशियाचा जोडीदार योगेंद्र कृष्णन् याच्यासोबत खेळून मिश्र दुहेरीची पुढील फेरीदेखील गाठली. प्राजक्ता-कृष्णन् यांनी हाँगकाँगचे चून माक-येयुंग नगाटिंग यांच्यावर २१-१४, २२-२० ने विजय नोंदविला. (वृत्तसंस्था)>रेड्डी-पोनप्पा पराभूतबी. सुमित रेड्डी-अश्विनी पोनप्पा यांना मात्र इंडोनेशियाचे टोटोव्ही अहमद-ग्लोरिया मॅन्यूएल या सहाव्या मानांकित जोडीकडून १७-२१, १७-२१ ने पराभवाचे तोंड पाहावे लागले. केपी श्रुती-हरिया हरिनारायण यांचादेखील मेई कुआन-विव्हियन हू या मलेशियाच्या जोडीकडून ९-२१, १३-२१ ने पराभव झाला.पहिला गेम मोठ्या फरकाने गमावल्यानंतर, दुसऱ्या गेममध्ये श्रुती - हरिया यांनी झुंज देण्याचा अपयशी प्रयत्न केला.साईराज रेड्डी-मनीषा यांना ताम चून- सेज याऊ या मलेशियन जोडीकडून पराभवाचा सामना करावा लागला.
सायना नेहवाल उपउपांत्यपूर्व फेरीत
By admin | Published: January 19, 2017 12:49 AM