शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
3
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
4
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
5
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
6
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
7
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
8
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
9
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
10
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
11
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
13
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
14
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
15
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
16
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
17
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
18
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
19
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
20
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश

Paris Olympics 2024 : क्रिकेटसारख्या सुविधा द्या, चीन, अमेरिकेप्रमाणे पदके जिंकू; सायना नेहवालचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 4:01 PM

भारताला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही.

saina nehwal olympics 2024 : भारतालापॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. अद्याप भारत सुवर्ण पदकाच्या प्रतीक्षेत आहे. नीरज चोप्रा आपल्या पदकाचा बचाव करून पुन्हा एकदा सोनेरी कामगिरी करेल असे अपेक्षित होते. मात्र, पाकिस्तानचा अर्शद नदीम त्याला वरचढ ठरल्याने भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारतात इतर खेळांच्या तुलनेत क्रिकेटची भलतीच लोकप्रियता आहे. क्रिकेट भारतीयांसाठी जणू काही एक धर्मच... या धर्माचे कोट्यवधी चाहते आहेत. क्रिकेटला भारतीयांना भरभरून प्रेम दिले. यामुळे इतर खेळांकडे दुर्लक्ष झाले अशी चर्चा दबक्या आवाजात होत असते. आता याबद्दल बोलताना भारताला बॅडमिंटनमध्ये पहिले पदक जिंकून देणाऱ्या सायना नेहवालने आपली खदखद व्यक्त केली आहे. 

२०२१ मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण सात पदके जिंकली होती. यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. पण, भारताला केवळ पाच पदके जिंकता आली आहेत. यामध्ये ४ कांस्य आणि एका रौप्य पदकाचा समावेश आहे. भारताच्या या निराशाजनक कामगिरीनंतर सायना नेहवालने नाराजी व्यक्त केली. तसेच प्रशासनाच्या धोरणांवरही टीका केली.

सायना नेहवालचा संताप

सायना नेहवालने एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आपल्या देशात केवळ आणि केवळ क्रिकेटला महत्त्व दिले जाते. अन्य खेळांना सुविधा किंवा आर्थिक मदत केली जात नाही. क्रिकेटपटूंना जे सहकार्य मिळते ते इतर खेळाडूंना मिळत नाही. क्रिकेटप्रमाणे इतर खेळांनाही देशात चांगल्या सुविधा मिळाल्या, तर ऑलिम्पिकमधील भारताची कामगिरी सुधारेल आणि चीन, अमेरिकेप्रमाणे पदके जिंकण्यातही भारतीय खेळाडू यशस्वी होतील, असे सायना नेहवालने सांगितले. 

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने आतापर्यंत चार कांस्य आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. गुरुवारी भारताच्या खात्यात आणखी दोन पदकांची नोंद झाली. भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadmintonIndiaभारत