नवी दिल्ली : आसाम येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालनेपी. व्ही. सिंधूवर विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत सायनाने सिंधूला २१-१८, २१-५ असे पराभूत केले. या स्पर्धेतील सायनाचा हा जेतेपदाचा चौकार ठरला आहे. यापूर्वी तीन वेळा सायनाने राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
अंतिम फेरी चांगलीच चुरशीची झाली. पण यामध्ये अखेर बाजी मारली ती सायनाने. सिंधू आणि सायना यांच्यामध्ये यापूर्वी दोन सामने झाले होते. त्यावेळी सिंधूपेक्षा सायनाच सरस ठरली होती. यावेळी सायनाने आपणच सिंधूविरुद्ध सरस असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. या स्पर्धेतील सायनाचे हे चौथे जेतेपद आहे. यापूर्वी सायनाने २००६, २००७ आणि 2017 साली जेतेपद पटकावले होते.
लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्यपदकाची कमाई केली होती. सिंधूने २०१३ साली रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकावले होते. राष्ट्रीय स्पर्धेत २०१३ साली सिंधूने राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर सिंधूला एकदाही राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही. राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद सिंधूने आतापर्यंत दोन वेळा पटकावले आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत सायनाने दुसऱ्यांदा सिंधूला पराभूत केले आहे. यापूर्वी २०१७ साली झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीतही सायनाने सिंधूवर मात केली होती.
या विजयानंतर सायना म्हणाली की, " ही एक फक्त लढत होती. सिंधूनेही चांगली कामगिरी केली. आम्ही दोघांनीही चांगली कामगिरी केली, पण आजचा दिवस सिंधूचा नव्हता."
पुरुषांमध्ये सौरभ वर्माने जिंकले जेतेपदपुरुषांच्या एकेरी विभागात सौरभ वर्माने सरळ गेम्समध्ये लक्ष्य सेनवर मात करत जेतेपद पटकावले. सौरभ वर्माने यापूर्वी २०११ आणि २०१७ सालीही राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. यावेळी झालेल्या अंतिम फेरीत १७ वर्षींय सौरभने ज्युनिअर आशियाई स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या लक्ष्य सेनला २१-१८, २१-१३ असे मात करत अजिंक्यपद पटकावले. पुरुषांच्या दुहेरीमध्ये प्रवण चोप्रा आणि चिराग शेट्टी यांनी जेतेपद पटकावले.