जकार्ता : तीन वेळची चॅम्पियन सायना नेहवाल हिने इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटनच्या पहिल्या फेरीत आठव्या मानांकित रेचानोक हिच्यावर विजय मिळवला. आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू हिने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंग हिला पराभूत करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला, तर मिश्र दुहेरीत बी. सुमीत रेड्डी आणि अश्विनी पोनाप्पा या भारतीय जोडीला इंडोनेशियाच्या इरफान एफ आणि वेनी ए यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.सात वर्षात पहिल्यांदा विश्व रँकिंगध्ये अव्वल दहातून बाहेर पडलेल्या सायनाने आठव्या मानांकित खेळाडू रेचानोक हिला २१-१७,२१-१८, २१-१२ असे पराभूत केले, तर याआधी तिचा रेचानोक विरोधातील कामगिरी ७ - ५ अशी होती. अता ती थायलंडच्या निशाओन जिंदापोल हिच्याविरोधात खेळेल. सायना हिने या सामन्यात चांगली सुरुवात करत पहिल्या गेममध्ये १०-४ अशी आघाडी घेतली होती. मात्र, रेचानोक हिने १४-१४ अशी बरोबरी साधली. मात्र, सायनाने हा गेम जिंकला आणि बाकीच्या दोन गेममध्येदेखील रेचानोक ही पुनरागमन करू शकली नाही. (वृत्तसंस्था)
सायना, सिंधू ‘इंडोनेशिया ओपन’च्या दुसऱ्या फेरीत
By admin | Published: June 14, 2017 1:15 AM