शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

सायना, सिंधू दुसऱ्या फेरीत

By admin | Published: April 07, 2016 2:06 AM

जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेली भारताची स्टार शटलर सायना नेहवालने मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी देताना दुसरी फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी

शाह आलम : जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेली भारताची स्टार शटलर सायना नेहवालने मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी देताना दुसरी फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या पी. व्ही. सिंधूनेही विजयी कूच करताना दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी पुरुष गटात मात्र भारताला मोठा झटका बसला आहे. ज्यांच्यावर पदकाची मदार होती ते एच. एस. प्रणय आणि किदांबी श्रीकांत दोघांनाही पहिल्याच फेरीत पराभवाचा झटका बसला. त्यामुळे पुरुष गटात भारताच्या पदकाच्या अपेक्षाही जवळपास संपुष्टात आल्या आहेत. स्पर्धेत तिसरे मानांकन असलेल्या सायनाने आपल्या लौकिकानुसार आक्रमक खेळ करताना थायलंडच्या नित्चाओन जिंदापोलचा ३० मिनिटांमध्ये२१-१६, २१-७ असा सहज पाडाव केला. नुकत्याच मागील आठवड्यात झालेल्या इंडिया ओपन स्पर्धेतही सायनाने जिंदापोलला नमवले होते. जिंदापोल जागतिक क्रमवारीत २७व्या स्थानी असून सायनाने तिच्याविरुद्ध सलग दुसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा विजय मिळवला. पहिल्या सेटमध्ये सावध भूमिका घेतलेल्या सायनाने जिंदापोलच्या खेळीचा अंदाज घेतला. या वेळी जिंदापोलने काही उत्कृष्ट फटके मारताना सायनाला लढत देण्याचा चांगला प्रयत्न केला. मात्र पहिला सेट जिंकल्यानंतर सायनाने फार वेळ न घेता जिंदापोलविरुद्ध तुफानी हल्ला चढवून सहजपणे बाजी मारली. दुसऱ्या फेरीत सायनापुढे बल्गेरियाच्या लिडा जेतचिरी आणि कोरियाच्या बाई यिओन जू यांच्यातील विजेत्या खेळाडूचे आव्हान असेल. तत्पूर्वी, भारताची अन्य स्टार खेळाडू सिंधूने अपेक्षित विजयी सलामी देताना चीनच्या एच. ई. बिंगजियाओचे कडवे आव्हान ४० मिनिटांत परतवले. सलग दोन सेटमध्ये बाजी मारताना सिंधूने २१-१६, २१-१७ अशा गुणांनी बिंगजियाओला स्पर्धेबाहेर जाण्यास भाग पाडले. जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानी असलेल्या बिंगजियाओविरुद्ध सिंधू पहिल्यांदाच खेळत होती. दुसऱ्या फेरीत सिंधूसमोर सातव्या मानांकीत कोरियाच्या की सूंग जी हियूनचे तगडे आव्हान असेल. जागतिक क्रमवारीत ८व्या स्थानी असलेल्या हियूनविरुद्ध सिंधूचे करिअर रेकॉर्ड ४-३ असे आहे. (वृत्तसंस्था)