दुबई : भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि के. श्रीकांत यांना वर्ल्ड सुपर सिरीज फायनल बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत अनुक्रमे नोजोमी ओकुहारा व केंटो मोमोटाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. महिलांच्या एकेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आणि नुकत्याच दुखापतीतून सावरलेल्या सायनाला आपल्या नावाला साजेसाच खेळ करता आला नाही. पहिल्या गेममध्ये १०-१० पासून तर १४-१४ गुण होईपर्यंत सायनाने कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण जागतिक क्रमवारीत १० क्रमांकावर असलेल्या २० वर्षीय नोजोमी ओकुहाराने पहिली गेम २१-१४ अशी जिंकली. दुसऱ्या गेममध्येसुद्धा सायनाला नोजोमीने कोणतीही संधी दिली नाही. तिने दुसरी गेम २१-६ अशी सहज जिंकत सामना ३५ मिनिटांत जिंकला. पुरुषांच्या एकेरीत भारताच्या के. श्रीकांतला जपानच्या मोमोटा के. ने २१-१३, २१-१३ असे नमविले.(वृत्तसंस्था)
सायना, श्रीकांत यांना पराभवाचा धक्का
By admin | Published: December 10, 2015 12:59 AM