शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: नाशिक शिक्षक मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत अखेर शिंदेसेनेच्या किशोर दराडेंचा विजय
2
"राहुल गांधींनी नाक घासून माफी मागावी; आम्ही हिंदू आहोत हे अभिमानाने सांगा, मी..."
3
अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; आणखी १४ जणांना मिळू शकते संधी
4
विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार का?; उद्धव सेना उमेदवार उतरवण्याच्या तयारीत
5
११००००००००० कोटींचा व्यवहार! बाबा रामदेव यांच्या Patanjali बाबत मोठं अपडेट, कोण घेतंय दंत आणि केश कांती?
6
पुणे मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू; पोलीस करणार सरकत्या जिन्यांचा तपास
7
Success Story : ज्या घडी डिटर्जेंटचे ब्रँड एम्बेसेडर आहेत बिग बी, त्याचे मालक कोण माहितीये? 'या' राज्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस फार चांगला जाईल, आर्थिक लाभ संभवतात!
9
दक्षिण कोरियामध्ये रस्ता ओलांडणाऱ्या लोकांना भरधाव कारने चिरडलं; ९ जणांचा मृत्यू, 4 जखमी
10
‘XXXXX’...अंबादास दानवेंची सभागृहातच शिवीगाळ; नंतर म्हणाले, "मला अजिबात पश्चात्ताप नाही"
11
हिंदूंबाबत राहुल गांधींच्या वक्तव्यानं गदारोळ, भाजपाचा निशाणा तर काँग्रेसचाही पलटवार
12
नीट-यूजी फेरपरीक्षा निकालात टॉपर्सची संख्या घटली; एकाही विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण नाहीत
13
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृती नाण्याचे विमोचन
14
वादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकली टीम इंडिया; कॅरेबियन बेटांवर अलर्ट जाहीर
15
नव्या कायद्याचा पहिला गुन्हा फेरीवाल्यावर; तक्रारदारालाच मदत करणाऱ्या तरतुदी
16
डोळ्यांत पाणी, ‘गोल्डन गेट ब्रिज’ची वारी थेट पंढरपूरला; बीएमएम अधिवेशनाचा शानदार समारोप
17
नीट परीक्षा ही श्रीमंतांसाठीच, ७ वर्षांत ७० वेळा पेपर फुटले; राहुल गांधींचा आरोप
18
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
19
‘त्या’ शिक्षकांना जुनी पेन्शन देण्याबाबत ३ महिन्यांत निर्णय; अजित पवारांची घोषणा
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी उद्धव ठाकरे अडचणीत; समिती करणार आरोपांची चौकशी

सायनाचे लक्ष विजेतेपदावर

By admin | Published: January 17, 2017 7:45 AM

मंगळवारपासून प्रारंभ होणाऱ्या मोसमातील पहिल्या ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेद्वारे सायना नेहवाल आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.

सारावाक : आज, मंगळवारपासून प्रारंभ होणाऱ्या मोसमातील पहिल्या ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेद्वारे सायना नेहवाल आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. सायनाने मलेशिया मास्टर्स स्पर्धेत जेतेपद पटकाविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सायनाने अलीकडेच प्रीमिअर बॅडमिंटन लीगमध्ये तीन सामने जिंकले, तर तिला आॅलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मारिन व रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू यांच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. अव्वल मानांकित सायनाला या स्पर्धेच्या निमित्ताने लय गवसण्याची चांगली संधी मिळाली आहे. कारण या स्पर्धेत कुणी अव्वल खेळाडू सहभागी झालेले नाहीत. गेल्या मोसमात सायना दुखापतीतून सावरल्यानंतर आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरली होती; पण रिओ आॅलिम्पिक स्पर्धेदरम्यान तिच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे तिला दुसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. दुखापतीतून सावरल्यानंतर सायनाने मकाऊ ओपन व हाँगकाँग ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. प्रीमिअर बॅडमिंटन लीगमध्ये सायनाचा संघ अवध वॉरियर्सला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली. पुरुष एकेरीमध्ये कश्यप पुनरागमन करण्याची शक्यता आहे. सहावे मानांकन प्राप्त अजय जयराम पहिल्या दिवशी पात्रता फेरीत खेळणार आहे. रिओ आॅलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणारा मनू अत्री व बी. सुमित रेड्डी दुहेरीमध्ये पात्रता फेरीत खेळणार आहेत. महिला विभागात अश्विनी पोणप्पा व एन. सिक्की रेड्डी या नव्या जोडीला मलेशियाच्या यी चिंग गो व के वेई वून या जोडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. (वृत्तसंस्था)