शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
2
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
3
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
4
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
5
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
6
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
7
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
8
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
9
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक
10
ICC Champions Trophy संदर्भात फायनली काय ठरणार ते आज तरी कळणार का?
11
मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप
12
Astrology Tips: सलग १० शुक्रवार करा 'हे' उपाय; लक्ष्मी घरातून काढणार नाही पाय!
13
"या चांडाळामुळे.…’’, काका पशुपती पारस यांची चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका  
14
लग्नानंतर ५ व्या दिवशी मृत्यूने गाठलं, नववधूसोबत आक्रित घडलं; आंघोळीला बाथरुममध्ये गेली अन्...
15
Astro Tip: कोणत्या गोष्टी केल्या असता घरात असलेली लक्ष्मी स्थिर राहते? जाणून घ्या!
16
आयुष्याची नवी सुरुवात! 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर
17
दुसऱ्या पत्नीला प्रॉपर्टीत अधिकार मिळतो का? पतीच्या मालमत्तेचे खरे वारसदार कोण? काय आहे कायदा?
18
Adani Group Stocks: 'या' सेगमेंटमध्ये अदानींच्या शेअर्सची एन्ट्री; ३ शेअर्सनं पकडला तुफान स्पीड, तुमच्याकडे आहे का?
19
"लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी अमेरिका..."; शार्प शूटरचा खळबळजनक खुलासा
20
नाना पाटेकरांना कशाची भीती वाटते? म्हणाले, "ना मृत्यूची ना कोणा व्यक्तीची पण...."

‘पद्मभूषण’साठी सायनाची शिफारस

By admin | Published: January 06, 2015 1:37 AM

भारताची स्टार बॅडमिंटनटपटू सायना नेहवाल हिची अखेर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केली आहे़

क्रीडा मंत्रालयाचा निर्णय : पुरस्कारासाठी वेळेत शिफारस केल्याचे बॅडमिंटन महासंघाचे स्पष्टीकरण नवी दिल्ली : भारताची स्टार बॅडमिंटनटपटू सायना नेहवाल हिची अखेर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केली आहे़ हा मानाचा पुरस्कार न मिळाल्याने सायनाने जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली होती़ यानंतर क्रीडा मंत्रालयाला हा निर्णय घेणे भाग पडले आहे़ दरम्यान, भारतीय बॅडमिंटन महासंघाने (बाई) या पुरस्कारासाठी वेळेत अर्ज दाखल केला होता, असे स्पष्टीकरण दिले आहे़पद्मभूषण पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाने दोन वेळा आॅलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशील कुमार याच्या नावाची शिफारस केली होती़ यानंतर या पुरस्कारासाठी आपल्या नावाची शिफारस न केल्याबद्दल सायनाने तीव्र नाराजी व्यक्त केली़ पुरस्काराबद्दलचा वाद वाढत चालल्याने अखेर मंत्रालयाने आॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाच्या नावाची पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा निर्णय घेतला़ पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस झाल्यामुळे सायना नेहवाल हिने आनंद व्यक्त केला आहे़ ती म्हणाली, की केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने एवढ्या लवकर दखल घेत पद्मभूषण पुरस्कारासाठी माझ्या नावाचा विचार केला, याचा आनंद आहे़ याबद्दल तिने केंद्रीय क्रीडामंत्री सरबानंद सोनोवाल यांचे विशेष आभार मानले़ याबद्दल क्रीडा मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले, की १ मे २०१४ रोजी गृहमंत्रालयाने पद्म पुरस्कारासाठी अर्ज मागितले होते़ या पुरस्कारासाठी अर्ज भरण्याची अखेरची तारीख १५ सप्टेंबर होती़ मात्र, भारतीय बॅडमिंटन महासंघाने (बाई) सायनाच्या नावाची शिफारस ३ जानेवारी रोजी केली होती़ त्यामुळे यापूर्वी तिच्या नावाचा विचार करण्यात आला नव्हता; मात्र आता मंत्रालयाने उशिरा का होईना गृहमंत्रालयाला सायनाच्या नावाची शिफारस केली आहे़बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष अशिलेख दासगुप्ता म्हणाले, की आम्ही आॅगस्ट २०१४ मध्येच सायना नेहवाल हिच्या नावाची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केली होती; मात्र याचे पत्र क्रीडामंत्री सरबानंद सोनोवाल यांच्याकडे उशिरा पोहोचले, यासाठी आम्ही जबाबदार नाही़ क्रीडा मंत्रालयाला पत्राची मूळ प्रत न पोहोचल्यामुळे आम्ही पुन्हा या पत्राची दुसरी प्रत पाठविली, असेही दासगुप्ता यांनी सांगितले़ दरम्यान, बॅडमिंटन महासंघाकडून आम्हाला कोणतेही पत्र मिळाले नाही़ त्यामुळे सायनाच्या नावाची पद्मभूषण पुरस्कारासाठी गृहमंत्रालयाकडे शिफारस करण्याचा प्रश्नच नाही, असे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले़ (वृत्तसंस्था)सायनाचे माध्यमांवर ताशेरेच्जागतिक मानांकनात चौथ्या क्रमांकावर असलेल्या सायना नेहवाल हिने माध्यमांवर ताशेरे ओढले़च्ती म्हणाली, की ज्या प्रकारे या पुरस्काराबद्दलचे वृत्त मीडियात दाखविण्यात आले याचे दु:ख आहे़ कारण हा पुरस्कार मला मिळावा, यासाठी मी मागणीच केली नव्हती़ मी केवळ नावाची शिफारस केली नाही, याबद्दल नाराजी व्यक्त केली होती़ हा पुरस्कार मला देण्यात यावा, असे मी कधीच म्हटले नव्हते़सुशील कुमारकडून सायनाला शुभेच्छाच्नवी दिल्ली : भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिची पद्मभूषण पुरस्कारासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने शिफारस केल्यामुळे भारताचा स्टार मल्ल सुशील कुमार याने सायनाचे अभिनंदन केले आहे़ च्तो म्हणाला, की केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने पद्म पुरस्कारासाठी सायनाच्या नावाची शिफारस केली, याचा आनंद आहे़ ज्या प्रकारे तिने बॅडमिंटनमध्ये देशाचा गौरव वाढविला आहे, त्याबद्दल ती या पुरस्कारासाठी पात्र उमेदवार आहे़