- ऑनलाइन लोकमत
न्युयॉर्क, दि. 27 - भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू साकेत मायनेनीला सर्बियाच्या पेड्जा क्रिस्टीन याला ६-३ , ६-० ने पराभूत केले. ५६ मिनिटे चाललेल्या या लढतीतील विजयाने अमेरिकी ओपन एकेरी पुरूष मुख्य फेरीत प्रवेश केला आहे.
साकेतला मुख्य फेरीत पोहचण्यासाठी पात्रता फेरीतील तीन सामने जिंकणे आवश्यक होते. त्याने एकही सेट न गमावता हे सामने जिंकले. या आधी पहिल्या सामन्यात साकेत याने स्थानिक खेळाडू मिशेल क्रेगर याला ७-६,६-४ ने पराभूत केले. पहिल्या फेरीत त्याने फ्रान्सच्या अलबानो ओलिवेट्टीला ७-५,६-३ ने पराभूत केले होते.
गेल्या वेळी युकी भांबरी आणि सोमदेव देव वर्मन यांनी ग्रॅण्डस्लॅम एकेरी स्पर्धेतील मुख्य फेरीत प्रवेश केला होता. साकेत या वर्षी आॅस्ट्रेलिया ओपनच्या पात्रतेसाठीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात पराभूत झाला होता. तर फ्रेंच ओपनच्या पात्रतेसाठीच्या दुसऱ्या सामन्यात त्याला पराभव स्विकारावा लागला होता.
पहिल्या सेटमध्ये साकेतने आपला प्रतिस्पर्ध्याची सर्व्हिस तीन वेळा तोडली. तर दुसऱ्या सेटमध्ये २६ मिनिटात साकेतने पेड्जाची सर्व्हिस तीन वेळेस तोडली. पेड्जाने चार डबल फॉल्ट केले. तर दोनच ऐस केले. साकेतने सात एस केले.