पुणे : समुराईज संघाने किर्पांन्स संघाचा २८७-२४२ गुणांनी पराभव करून टेबल-टेनिस, टेनिस व बॅडमिंटन या तिन्ही खेळांचा समावेश असलेल्या पीवायसी स्पेक्ट्रम रेस ३०९ रॅकेट लीग स्पर्धेत विजेतेपद जिंकले. पीवायसी हिंदू जिमखानाच्या वतीने जिमखानाच्या हॉल व कोर्टवर संपलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत टेनिसमध्ये प्रशांत सुतार, राधिका कानिटकर, आर्यन सुतार, अवनी क्षीरसागर, तनया गोसावी, अथर्व अय्यर, आश्विन गिरमे, आदित्य कानिटकर यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर समुराईज संघाने किर्पांन्स संघाचा १०३-७४ असा पराभव करून २९ गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर, टेबल टेनिसमध्ये बिपिन चौबे, प्रशांत सुतार, आर्यन सुतार, अवनी क्षीरसागर, अतुल बिनीवाले, राधिका कानिटकर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर समुराईज संघाने किर्पांन्स संघाचा ९९-७१ असा पराभव करून ५७ गुणांची आघाडी घेतली. बॅडमिंंटनमध्ये किर्पांन्स संघाने समुराईज संघाचा ९७-८५ असा पराभव केला व ही आघाडी कमी केली, पण सामन्यात एकूण ४५ गुणफरकाच्या आधारावर समुराईज संघाने किर्पांन्स संघावर विजय मिळवला. (क्रीडा प्रतिनिधी)
समुराईज संघाला शानदार विजेतेपद
By admin | Published: June 28, 2016 3:28 AM