शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
6
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
7
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
8
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
9
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
11
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
12
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
13
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
14
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
15
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
16
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
17
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
18
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
19
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...

मुंबई महापौर कॅरम स्पर्धेत संदीप व संगीता यांचे विजेतेपद

By admin | Published: March 16, 2016 8:38 AM

संदीप देवरूखकर आणि संगीता चांदोरकर या अनुभवी व बलाढ्य खेळाडूंनी आपआपल्या अंतिम सामन्यात अपेक्षित विजय मिळवताना १९व्या मुंबई महापौर चषक कॅरम स्पर्धेत अनुक्रमे

मुंबई : संदीप देवरूखकर आणि संगीता चांदोरकर या अनुभवी व बलाढ्य खेळाडूंनी आपआपल्या अंतिम सामन्यात अपेक्षित विजय मिळवताना १९व्या मुंबई महापौर चषक कॅरम स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे विजेतेपद पटकावले. ओएनजीसी संघाकडून खेळणाऱ्या संदीपला विजेतेपदासाठी रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेने चांगलेच झुंजवले. पहिला गेम २५-० असा सहजतेने जिंकल्यानंतर संदीपला प्रशांतने कडवी टक्कर दिली. या वेळी प्रशांतने काही अप्रतिम फटके मारताना झुंजाररीत्या २५-१२ अशी बाजी मारून सामना निर्णायक तिसऱ्या गेममध्ये नेला. यावेळी अनुभवी संदीपने आपला हिसका दाखवताना एकहाती वर्चस्व राखत २५-०, १२-२५, २५-८ अशा गुणांनी विजेतेपद निश्चित केले. महिलांचा अंतिम सामना मात्र पूर्णपणे एकतर्फी झाला. रिझर्व्ह बँकेच्या संगीताने केलेल्या आक्रमक खेळापुढे पीसीडीएच्या प्रीती खेडेकरचा काहीच निभाव न लागल्याने तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पहिला गेम २५-१४ असा जिंकल्याने संगीताने कामगिरीत सातत्य ठेवताना दुसऱ्या गेममध्ये २५-१३ अशी बाजी मारून प्रीतीला धक्का दिला.