शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सानिया, हिंगीसमध्ये अवघ्या ५ गुणांचे अंतर

By admin | Published: September 13, 2016 3:47 AM

भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांच्यात सोमवारी जाहीर झालेल्या महिला दुहेरीच्या रँकिंगमध्ये फक्त ५ गुणांचे अंतर उरले आहे.

नवी दिल्ली : यशस्वी रथावर जवळपास दीड वर्ष एकमेकांच्या साथीने आरूढ राहिल्यानंतर आता वेगवेगळ्या जोडीदारांसह खेळणारी भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांच्यात सोमवारी जाहीर झालेल्या महिला दुहेरीच्या रँकिंगमध्ये फक्त ५ गुणांचे अंतर उरले आहे.सानिया आणि हिंगीस यांनी गतवर्षी मार्च महिन्यात जोडी बनवली होती. ही जोडी यावर्षी विम्बल्डनपर्यंत कायम होती. यादरम्यान तीन ग्रँडस्लॅम स्पर्धेत विजेतेपद पटकावले; परंतु विम्बल्डननंतर या दोघींनी आपला वेगवेगळा मार्ग अवलंबला. या दोन्ही खेळाडंूनी वर्षअखेरची ग्रँडस्लॅम यूएस ओपन आणि त्याआधी एका स्पर्धेत वेगवेगळ्या साथीदारांसह सहभाग नोंदवला होता. यूएस ओपनमध्ये या दोन्ही खेळाडूंना यश मिळाले नाही. सानिया उपांत्यपूर्व फेरीत, तर हिंगीस उपांत्य फेरीत पोहोचली होती. विशेष म्हणजे या दोघींनी गतवर्षी या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. सानियाचे ताज्या रँकिंगमध्ये ९७३० गुण आहेत आणि ती दुहेरीत अव्वल स्थानी आहे; परंतु तिचे हिंगीसमधील अंतर फक्त ५ गुण राहिले आहे. रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या हिंगीसचे ९७२५ गुण आहेत. 

साकेत १३७व्या रँकिंगवरअमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रथमच स्थान मिळवणारा साकेत मिनेनी जाहीर झालेल्या एटीपीच्या विश्व रँकिंगमध्ये आपल्या सर्वोत्तम १३७ व्या रँकिंगवर पोहोचला आहे. स्पेनविरुद्ध डेव्हिस चषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा २८ वर्षीय मिनेनीने पात्रता फेरीत तीन सामने जिंकून अमेरिकन ओपनमध्ये मुख्य फेरीत प्रवेश मिळवला होता. याचा त्याला सहा गुणांचा फायदा झाला.