सिनसिनाटी : भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस जोडीला डब्ल्यूटीए सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत चिनी तैपेई जोडीकडून पराभव पत्करावा लागला. अग्रमानांकित सानिया-हिंगीसला हाओ चिंग चान व यंग जान चान जोडीने ४-६, ६-०, ६-१० असे नमविले. सानिया-हिंगीस जोडीची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी पहिला सेट गमाविल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये उत्कृष्ट खेळ करून विजय नोंदविला. तिसऱ्या सेटमध्ये मात्र या अव्वल जोडीला सूर गवसलाच नाही. त्याना हाओ-यंग जोडीकडून हार मानावी लागली.(वृत्तसंस्था)
सानिया-हिंगीस जोडी पराभूत
By admin | Published: August 23, 2015 11:40 PM