शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

सानिया-हिंगीस उपांत्य फेरीत; बोपन्ना-मर्जिया पराभूत

By admin | Published: October 30, 2015 10:30 PM

जागतिक टेनिसमधील अव्वल महिला जोडी सानिया मिर्झा - मार्टिना हिंगीस यांनी आपला धडाकेबाज खेळ कायम राखताना डब्ल्यूटीए फायनल्सच्या उपांत्य फेरीत धडक मारली

सिंगापूर : जागतिक टेनिसमधील अव्वल महिला जोडी सानिया मिर्झा - मार्टिना हिंगीस यांनी आपला धडाकेबाज खेळ कायम राखताना डब्ल्यूटीए फायनल्सच्या उपांत्य फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे सानिया - हिंगीस जोडीने सलग २० सामन्यात विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे.संभाव्य विजेत्या मानल्या जात असलेल्या या अव्वल जोडीने स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आपल्या लौकिकानुसार खेळ करताना दणदणीत विजयांचा धडाका लावला. वेगवान व चपळतेने खेळताना या अव्वल जोडीने सर्वच प्रतिस्पर्ध्यांना आपला खेळ खेळण्याची फारशी संधी दिली नाही. उपांत्य सामन्यातही सानिया - हिंगीस जोडीने आपला धडाका कायम राखताना हंगेरीच्या टिमीया बाबोस आणि फ्रान्सच्या क्रिस्टीना मालडेनोविच यांचा सरळ दोन सेटमध्ये ६-४, ७-५ असा पाडाव केला.पहिल्या सेटमध्ये निर्णायक क्षणी खेळ उंचावून बाजी मारल्यानंतर सानिया - हिंगीस यांना दुसऱ्या सेटमध्ये काहीसे झुंजावे लागले. यावेळी टिमीया - क्रिस्टीना यांनी अव्वल जोडीविरुध्द तोडीस तोड खेळ करुन सामना तिसऱ्या सेटमध्ये नेण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र अंतिम क्षणी अनुभवाच्या जोरावर बाजी मारताना सानिया - हिंगीस यांनी उपांत्य फेरीत आगेकूच केली. स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात सानिया - हिंगीस समोर चीनी तैपईच्या चान हाओ चिंग - चान यंग जान या तिसऱ्या मानांकीत जोडीविरुध्द लढावे लागेल. गतवर्षी झिम्बाब्वेच्या कॅरा ब्लॅकच्या साथीने खेळताना सानियाने डब्ल्यूटीए फायनल्समध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. (वृत्तसंस्था)