न्यूयॉर्क : एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात अव्वल मानांकीत सानिया मिर्झा - मार्टिना हिंगीस जोडीने केसी डेलाक्वा (आॅस्टे्रलिया) व श्वेदोवा (कझाकस्तान) या जोडीचा ६-३, ६-३ असा सहज पराभव करून यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. विम्बल्डननंतर मिर्झा - हिंगीस जोडीचे हे सलग दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले. भारताच्या लिएंडर पेसने हिंगीसच्या समवेतच मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले असल्याने यंदा ग्रॅण्डस्लॅममध्ये दुहेरी यश मिळाले आहे. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात अव्वल मानांकीत सानिया मिर्झा - मार्टिना हिंगीस जोडिने सहजपणे यूएस ओपन महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. विम्बल्डन नंतर मिर्झा - हिंगीस जोडीचे हे सलग दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले. विशेष म्हणजे एक दिवसआधीच भारताच्या लिएंडर पेसनेसुध्दा हिंगीस सोबत मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले असल्याने यंदाच्या यूएस ओपनमध्ये भारताने दुहेरी गटात डबल धमाका केला. आर्थर एस स्टेडियममध्ये झालेल्या या एकतर्फी अंतिम सामन्यात अव्वल मानांकीत जोडीने एकहाती वर्चस्व राखले. सुरुवातीपासूनच आक्रमक सुरुवात केलेल्या मिर्झा - हिंगीसने केसी डेलाक्वा (आॅस्टे्रलिया) - श्वेदोवा (कझाकस्तान) यांना क्वचितंच संधी दिली. या मार्झा - हिंगीस जोडीने १ तास ९ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात डेलाक्वा - श्वेदोवा यांचा ६-३, ६-३ असा फडशा पाडला.पहिला सेट ३१ मिनिटांमध्ये जिंकलेल्या मिर्झा - हिंगीस जोडीने नेटवर आक्रमक खेळ करताना दबदबा राखला. यावेळी अनुभवी हिंगीसचा खेळ लक्षवेधी ठरला. तीने नेट्सवर अधिक भर देताना प्रतिस्पर्धी जोडीला डोके वर काढण्याची एकही संधी दिली नाही. दुसऱ्या सेटमध्ये मिर्झाकडून सर्विस करताना चुका झाल्या. मात्र दुसऱ्या बाजूने हिंगीसने त्याची भरपाई करताना अनुभवाच्या जोरावर बाजी मारली. दरम्यान, डेलाक्वा - श्वेदोवा जोडीने दुसऱ्या सेटमध्ये झुंज देण्याचा चांगला प्रयत्न केला. ०-२ असे पिछाडीवर असताना त्यांनी २-३ अशी भरपाई केली खरी. मात्र यानंतर सलग ३ सेट जिंकून मिर्झा - हिंगीसने त्यांच्यावर दडपण आणले. यावेळी आठवा सेट जिंकताना डेलाक्वा - श्वेदोवाने आव्हान कायम ठेवले. मात्र नवव्या सेटमध्ये मिर्झा - हिंगीसने तुफान हल्ला करताना विजेतेपद निश्चित केले. (वृत्तसंस्था)
सानिया-मार्टिनाचा ग्रॅण्ड धमाका
By admin | Published: September 14, 2015 12:40 AM