ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. १४ - सानिया मिर्झा आणि रोहण बोपन्ना यांना रिओ ऑलिम्पिक टेनिसच्या मिश्र दुहेरी स्पर्धेतील उपांत्य फेरीत पराभवला सामोरे जावे लागले.
उपांत्य फेरीत सानिया मिर्झा आणि रोहण बोपन्ना या जोडीचा अमेरिकेच्या व्हिनस आणि राजीव या जोडीने २-६, ६-२, १०-३ असा पराभव केला. सानिया मिर्झा आणि रोहण बोपन्ना या जोडीने जर विजय मिळविला असता तर भारताचे एक पदक निश्चित होते. मात्र, आता उपांत्य फेरीत पराभव झाल्यामुळे या जोडीला कांस्य पदक जिंकण्यासाठी खेळावे लागणार आहे. आत्तापर्यंत भारताने आॅलिम्पिक टेनिसमध्ये पेसच्या कांस्याच्या रूपात एकच पदक जिंकले आहे.
सानिया मिर्झा आणि रोहण बोपन्ना यांनी ऑलिम्पिक टेनिसच्या मिश्र दुहेरीत ब्रिटनची जोडी अॅण्डी मरे-हिथर वाटसन यांच्यावर सहज विजय नोंदवित ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली होती.